Maharashtra Cabinet Portfolio: उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कामाला नेहमीच प्रथम प्राधान्य देतात. त्यांच्या कामातील काटेकोरपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे. आज खातेवाटपाची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांसाह बैठक घेतली. वित्त व नियोजन विभागाचा पदभार स्वीकारत मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरील 503 दालनात वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव व्यय ओमप्रकाश गुप्ता यांच्याकडून अजित पवारांनी राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त आणि नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त आणि नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. सकाळी लवकर मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते अभ्यागत नागरिकांना भेटले.
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाच्या दालनात असून या दालनातूनच ते आपल्या विभागांचे तसेच उपमुख्यमंत्रीपदाचे कामकाज पाहणार आहेत.
खातेवाटप जाहीर; कुणाला कोणतं खातं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे फक्त वित्त व नियोजन हे खातं असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.