Maharashtra Political Crisis Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: तब्बल १० महिन्यांनंतर होणार फैसला! जाणून घ्या महाखटल्याच्या सुनावणीमधील महत्वाच्या ५ गोष्टी

Supreme Court Final Decision: जाणून घ्या राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा या संपूर्ण सुनावणीचा घटनाक्रम कसा होता..

Gangappa Pujari

विकास झाडे, प्रतिनिधी...

Supreme Court Hearing on ShivSena: महाराष्ट्राच्या सत्ताकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ राज्यातील सत्ता संघर्षावर महत्त्वाचा निकाल देणार आहे. हा निकाल ऐतिहासिक असाच असणार आहे. या निकालामुळे राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार राहणार की नाही? याचा फैसला होणार आहे.

या शिवाय त्या 16 आमदारांची आमदारकी राहणार की जाणार? याचाही फैसला आजच होणार आहे. तत्पुर्वी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा या संपूर्ण सुनावणीचा घटनाक्रम कसा होता, ते जाणून घेवू. (Latest Marathi News)

शिवसेनेत मोठी फूट...

जून 2022 मध्ये शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार नॉट रिचेबल झाले. विधिमंडळ पक्षनेत्याच्या बैठकीलाही हे आमदार उपस्थित राहिले नाहीत. ज्यानंतर या सत्ता संघर्षाला सुरूवात झाली.

२९ जून २०२२ - शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे बहुमत नसल्याचं सांगून बहुमत चाचणी घेण्याची विनंती राज्यपालांना केली. ज्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसात बहुमत सिद्ध करा, असे निर्देश महाविकास आघाडी सरकारला दिले.

१ जुलै २०२२- विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र घोषित केले. या आमदारांना विश्वास ठरावावेळी मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी याचिका ठाकरे गटाने दाखल केली होती. परंतु शिवसेनेची ही याचिका फेटाळून अपात्रतेवर ११ जुलैला सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

८ जुलै २०२२- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली. या नियुक्तीला ठाकरे गटाकडून आव्हान देण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीलाही आव्हान देण्यात आले. या दोन्ही याचिकांवर ११ जुलैलाच निर्णय होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

११ जुलै २०२२- शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबद्दल कोणताही निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

२० जुलै २०२२- सर्व याचिकांवर शिंदे व ठाकरे गटांच्या वकिलांनी युक्तीवाद केला. हा युक्तीवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना २७ जुलै पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले व पुढील सुनावणी १ ऑगस्टला होईल, असे स्पष्ट केले.

३ ऑगस्ट २०२२- या दोन्ही पक्षांच्या याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात केला. सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय न देता सुनावणी ४ ऑगस्टला होईल, असे स्पष्ट केले.

४ ऑगस्ट २०२२- निवडणूक आयोगाने धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. पुढील सुनावणी ८ ऑगस्टला होईल, हे स्पष्ट केले. मात्र त्यानंतर त्यानंतर ८ ऑगस्ट, १२ ऑगस्ट व २२ ऑगस्टला सुनावणी झाली नाही.

२३ ऑगस्ट २०२२- राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आता पाच सदस्यीय घटनापीठापुढे होणार असल्याचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी स्पष्ट केले तसेच निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय २५ ऑगस्टपर्यंत घेऊ नये, असे निर्देश दिले. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT