Ajit Pawar News Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News: मै फायर हूँ.. बंडखोरी करणारे सगळे पराभूत होतील; नाशिकमधून शरद पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar Vs Ajit Pawar: राष्ट्रवादीतील बंडांनंतर शरद पवार यांनीही मैदानात उतरत दंड थोपटले असून आज त्यांची पहिली सभा येवल्यात होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी आता थेट राष्ट्रवादी पक्षावरच दावा केला आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीतील बंडांनंतर शरद पवार यांनीही मैदानात उतरत दंड थोपटले असून आज त्यांची पहिली सभा येवल्यात होत आहे. सभेआधी शरद पवार यांचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत केले. यावेळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Maharashtra Politics)

काय म्हणाले शरद पवार...

"नाशिकला ऐतिहासिक वारसा असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनाही पहिल्यांदा नाशिककरांनीच संसदेत पाठवले होते. त्यामुळेच राज्याच्या दौऱ्याला नाशिकमधून सुरूवात केल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच यशवंतराव चव्हाण हे आमचे आदर्श असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबद्दल बोलताना शरद पवार यांनी "छगन भुजबळ यांना येवल्याचा पर्याय मीच दिला होता, असे सांगत मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही. मात्र बंडखोरी करणारे सर्वजण पराभूत होतील..." असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला...

मैं फायर हुं; म्हणत पवारांनी रणशिंग फुंकले....

दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांना त्यांच्या वयावरुन प्रश्न विचारण्यात आला. ज्याला उत्तर देताना त्यांनी "मैं ना टायर्ड हूं, ना रिटायर्ड हूं, मैं तो फायर हुं.." अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आगामी काळात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा थेट सामना पाहायला मिळणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे... (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varora Vidhan Sabha : वरोरा विधानसभा क्षेत्रात बंडखोरांचे आव्हान; बहुरंगी लढतीने राजकीय समीकरण बदलणार

Maharashtra News Live Updates: महायुतीच्या नेत्यांच्या अमित शहांसोबत बंद दाराआड चर्चा

Mental Health : आयुष्यातील चढ-उतारांमुळे मानसिक आरोग्य बिघडलंय? 'हा' रामबाण उपाय करा कायम मूड राहील फ्रेश

Diabetic Patients: मधुमेही रुग्ण इडली खाऊ शकतात की नाही?

Mallikarjun Kharge : त्यांनी आमच्याच योजना कॉपी केल्यात, मल्लिकार्जुन खरगेंचा महायुतीवर आरोप

SCROLL FOR NEXT