Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्यातील सत्ता संघर्षासाठी तीन दिवस महत्त्वाचे, पुढील आठवड्यात सलग सुनावणी

Shivsena Crisis : हे तीन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणार आहे.

Shivaji Kale

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्ता संघर्षावर पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टासमोर सलग तीन दिवस होणार सुनावणी आहे. या सुनावणीकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पुढील आठवड्यात 21, 22 आणि 23 फेब्रुवारी अशी सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. हे तीन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात नुकताच सलग तीन दिवस युक्तिवाद झाला. यात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून आपापली बाजू मांडण्यात आली. या युक्तिवादात अनेक दावे-प्रतिदावे देखील करण्यात आले. यानंतर हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार का असा प्रश्न होता. परंतु या प्रकरणावर आता पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच सुनावणी होणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान निवडणूक आयोगाने नुकताच शिवसेनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला आहे. विशेष म्हणजे शिंदे आणि ठाकरे गट या दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबातचा निकाल राखून ठेवला होता. (Maharashtra Politics)

परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधीच निवडणूक आयोगाने निकाल दिल्याने त्याचा परिणाम सुप्रीम कोर्टात कसा होणार आणि शिंदे गट निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरून काय नवीन युक्तीवाद करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात 21 तारखेपासून होणारी सुनावणी राज्याच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT