Uddhav Thackeray Speech: निवडणूक आयोगाच्या निकालाने 'मोगॅम्बो खूश हुआ', उद्धव ठाकरेंचं अमित शाहांवर टीकास्त्र

मी भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySam Tv
Published On

Uddhav Thackeray : राज्यातील राजकीय घडामोडींदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अमित शाह यांचा तर मोगॅम्बो म्हणून उल्लेख त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर मोगॅम्बो खूश झाला आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मी भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. मला त्यांचं हिंदुत्व मान्य नाही. राज्यात महाविकास आघाडी झाली. मात्र भाजपनेच काँग्रेससोबत जाण्यास भाग पाडलं. बाळासाहेबांनी सांगितलेलं हिंदुत्व आम्ही मानतो. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. (Political News)

Uddhav Thackeray
Sanjay Raut : 'शाखा ताब्यात घ्यायला त्यांचे बाप...', संजय राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा घणाघात

शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण ज्यांनी हिसकावून घेतलं आहेत त्यांना माझं आव्हान आहे, त्यांनी मैदानात उतरावं आणि निवडणून लढावी. मी मशाल घेऊन येतो, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. सध्या जे सुरु आहे ती लोकशाही आहे का? जे सुरू आहे ते तुम्हाला मान्य आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray
Jalana News: धक्कादायक! 2 लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, 1 लाख देवून केली सुटका; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

2014 मध्ये भाजपने युती तोडली, मी नाही. तेव्हा देखील आम्ही हिंदूच होतो ना? निवडणूक अर्ज भरण्याच्या 1 दिवस आधी युती तोडली, तरी एकटे लढून 63 जागा जिंकल्या.नंतर त्यांच्या लक्षात आलं, शिवसेना तर लागणार, तेव्हा ते परत आले.

2019 निवडणुकीत आमच्या पोस्टरवर मोदीजींचा फोटो होता, त्यांच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो होता.एक काळ होता, लोक रॅलीमध्ये मोदीजींचा मुखवटा घालून येत होते, आता मोदीजी बाळासाहेबांचा मुखवटा धारण करून येत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com