Jalana News: धक्कादायक! 2 लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, 1 लाख देवून केली सुटका; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

या धक्कादायक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ माजली असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalana News
Jalana NewsSaamtv

लक्ष्मण सोळुंके..

Jalana News: जालना शहरात दोन लाखांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कारमधून या व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले असून एक लाख रुपये देत या व्यापाऱ्याने स्वतःची सुटका करुन घेतली. या धक्कादायक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ माजली असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalana News)

Jalana News
Viral Video: Local मध्ये घुमतोय जादूई आवाज; तिच्या जिद्दीची कहाणी ऐकून कराल सलाम, पाहा VIDEO

याबाबत लतीफखान समशेरखान पठाण यांनी चंदणझिरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते घरी असताना सायंकाळी ७ ते ७:३० वाजेचे दरम्यान त्यांच्या घरी त्यांच्या ओळखीचे शहरातील सुंदरनगर परिसारत राहणारे शेख शेरीफ शेख शफी व सय्यद हादी सय्यद आले. यावेळी त्यांच्यासोबत आणखी दोन आले होते. या चौघांनी त्यांना सहज बाहेर जाऊन यायच आहे अस सांगत ग्रे रंगाच्या आय 20 कारमध्ये बसवले.

ही कार औरंगाबादच्या दिशेने घेऊन जात बदनापूर तालुक्यातील शेलगाव शिवारात असलेल्या डोंगराळ भागात नेऊन त्या ठिकाणी त्यांनी मला गाडी थांबवून शिविगाळ करत मारहाण करत खंडणी म्हणून दोन लाखाच्या रकमेची मागणी केली.या वेळी त्यांनी गळ्याला खंजीर लावून पैसे न दिल्यास तुला जिवे मारतो अस सांगत माझ्याकडून बळजबरीने एक लाखाची खंडणी वसूल केली असल्याचे फिर्यादीत म्हंटल आहे

Jalana News
Sushma Andhare: महाराज माफ करा! 'गद्दार ताठ मानेने फिरतोय...' सुषमा अंधारेंचे भावनिक पत्र

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत चंदणझिरा पोलिसांनी तात्काळ आरोपी शेख शेरीफ शेख शफी व सय्यद हादी सय्यद हसन यांच्या सह त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर अपहरण करून हत्या करण्याची धमकी देऊन बळजबरी खडणी वसुली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात असून चार ही आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. (Kidnapping)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com