Jitendra Awhad Jayant Patil Saamtv
महाराष्ट्र

Ajit Pawar NCP News: जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार; अजित पवारांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

Maharashtra Political News: राष्ट्रवादीत दोन गट झाले असून दोन्ही गटाकडून आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Political Crisis News: अजित पवार यांनी पक्षातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठं खिंडार पडलं आहे. यानंतर राष्ट्रवादीत दोन गट झाले असून दोन्ही गटाकडून आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा केला जात आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह शपथविधी घेणाऱ्या ९ आमदारांविरोधात पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत कारवाई केली.

त्यानंतर आता अजित पवार यांच्याकडून जिंतेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्या संदर्भातले पत्र विधान सभा अध्यक्षांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार...

याबाबत अधिक माहिती अशी की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचासोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नऊ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका देणाऱ्या जयंत पाटील आणि प्रतोद जितेंद्र आव्हाड यांना अजित पवारांनी उत्तर दिले आहे.

ज्यामध्ये त्यांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्यासंबंधी विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिले आहे. अशी माहिती दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आता दोन गटातील वाद पाहायला मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष...

तसेच या पत्रकार परिषदेत  सुनिल तटकरे (Sunil Tatkare)पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याचीही घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे राज्याचे महिला अध्यक्षपद देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT