Maharashtra Politics: काँग्रेसची मागणी रास्त... विरोधी पक्षनेतेपदाबाबत बोलताना शरद पवारांचं मोठं वक्तव्य

NCP Political Crisis : अजित पवार यांनी पक्षातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठं खिंडार पडलं आहे.
Maharashtra Political Leaders Of Opposition
Maharashtra Political Leaders Of Oppositionsaam tv
Published On

Maharashtra Political Leaders Of Opposition: अजित पवार यांनी पक्षातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठं खिंडार पडलं आहे. यानंतर राष्ट्रवादीत दोन गट झाले असून दोन्ही गटाकडून आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा केला जात आहे. अजित पवारांनी (Sharad Pawar News) सहकाऱ्यांसोबत घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीकडे असलेल्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा केला आहे. काँग्रेसच्या या दाव्यावर शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी विधानसभेचा विरोधी पक्षनेत्यावर काँग्रेसकडून दावा केला जात आहे, तर त्यावर तुमचं मत काय आहे असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर परवारंनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

Maharashtra Political Leaders Of Opposition
Buldhana News: कमी उंचीवरून गेले हेलिकॉप्टर; कर्कश आवाजात बिथरल्‍याने बैल गंभीर जखमी

शरद पवार म्हणाले, 'विधानसभेचे सर्वाधिक सदस्य ज्या पक्षाकडे आहे तो पक्ष या पदावर दावा करू शकतो. सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाचा नेता या पदावर बसू शकतो. माझ्या माहितीनुसार आज काँग्रेस पक्षाकडे सर्वात जास्त विधानसभा सदस्य आहेत. सगळ्यात जास्त सदस्य त्यांच्याकडे असतील आणि ते विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करत असतील तर त्यांची मागणी रास्त आहे'.

शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे अजित दादांच्या बंडानंतर शरद पवार समर्थक गटातील आमदारांची संख्या कमी झाली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्याचं विरोधी पक्षनेतेपद आता काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. कारण सध्या विरोधी पक्षांपैकी काँग्रेसकडे विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहेत. (Breaking News)

Maharashtra Political Leaders Of Opposition
Sharad Pawar News : शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेत फिरवली भाकरी, इतिहासात प्रथमच...

अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या 35 ते 40 आमदारांचा पाठिंबा असल्याची सध्या चर्चा आहे. म्हणजेच शरद पवार यांच्याकडे आमदारांची संख्या 14 ते 19 असू शकते. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी पक्षाचे संख्याबळ विधानसभेत कमी झाली झाले आहे हे स्पष्ट होते. दुसरीकडे ठाकरे गटाकडे विधानसभेत 16 आमदार आहेत, तर काँग्रेसकडील आमदारांची संख्या सर्वाधिक 44 आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

काँग्रेसमधील या 3 नावांची चर्चा

काँग्रेसमध्ये देखील आता विरोधी पक्षनेतेपदाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेतेपदासाठी तीन नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. यात काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com