Nana Patole, Sharad pawar and Ajit Pawar Maharashtra Politics  SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Political News : अजित पवार स्वगृही परततील; शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंची 'गुगली'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nana Patole On Sharad Pawar-Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विधानानंतर राजकारणाच्या पिचवर जबरदस्त टोलेबाजी सुरू असतानाच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'गुगली' टाकली आहे. अजित पवार यांचे मन वळवण्यात शरद पवार यांना यश आले असावे असे त्यांच्या विधानावरून वाटते. अजित पवार पुन्हा स्वगृही परततील, असे चित्र दिसते आहे, असे पटोले म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नाही, असं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ठामपणे सांगितलं आहे. मात्र, त्यांच्या विधानावरून राजकीय फटाके मात्र फुटू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार हे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. अजित पवारांनी घेतलेल्या भेटीनंतर परत यावे असे अजित पवारांना वाटत असावे. अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवार यांनाही यश आले असावे असेच शरद पवार यांच्या विधानावरून दिसत आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा स्वगृही परततील असे चित्र दिसत आहे, असे पटोले म्हणाले.

काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात कुठलाही संभ्रम नाही

शरद पवार यांच्याबद्दल काँग्रेस पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात कोणताही संभ्रम नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्ष मजबुतीने शरद पवारांच्या पाठीशी उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय चालले आहे आणि त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, भाजपच्या विरोधात जे पक्ष लढण्यासाठी एकत्र येतील त्यांना सोबत घेऊन लढू, असा निर्धार नाना पटोले यांनी बोलून दाखवला.

जनतेला दाखवलेली स्वप्ने मोदींनीच मोडीत काढली - पटोले

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील असा सर्व्हे नुकताच प्रसिद्ध झाला. त्यावरही पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षच सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल असे दोन वर्षांपासून सांगत आहे. तेच चित्र या सर्व्हेतून पाहायला मिळत आहे. लोकांचा काँग्रेस पक्षावर विश्वास वाढत आहे, असे ते म्हणाले.

जनतेने नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवत बहुमताने सत्ता दिली; पण जनतेला दाखवलेली स्वप्ने मोदींनीच मोडीत काढली. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, परदेशातील काळा पैसा आणू अशी भरमसाठ आश्वासने दिली. त्यातील एकही ते पूर्ण करू शकले नाहीत. मोदी सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे जनतेत भाजप व नरेंद्र मोदी यांच्याबद्दल चीड आहे. राज्यातील सरकारनेही जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. शेतमालाला भाव नाही म्हणून ते रस्त्यावर उतरले आहेत. पीक येताच बाजारात भाव पाडले जातात. यामुळे लोक भाजपला कंटाळले आहेत, असे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT