Ajit pawar On Sharad Pawar: शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?

Ajit pawar On Sharad Pawar: 'शरद पवारांच्या वक्तव्याबाबत मला बोलायचं नाही, असं म्हणत अजित पवारांनी उत्तर द्यायचं टाळलं.
Ajit Pawar Sharad PAwar
Ajit Pawar Sharad PAwarSaam TV
Published On

Ajit pawar News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवार हे आमचेच नेते असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'शरद पवारांच्या वक्तव्याबाबत मला बोलायचं नाही, असं म्हणत अजित पवारांनी उत्तर द्यायचं टाळलं. (Latest Marathi News)

अजित पवार आज पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शहरात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर याठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार विविध विषयांवर भाष्य केलं.

Ajit Pawar Sharad PAwar
Girish Mahajan On Sharad Pawar: 'शरद पवारांनी मोदींशिवाय देशाला पर्याय नाही हे मान्य केलंय'; भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं विधान

अजित पवार म्हणाले, 'मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली. राज्यातील प्रत्येक विभागाचे काम करण्याचे आमचा ध्यास आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत असून चांद्रयान-३ यशस्वी झालं आहे. यामुळे देशाचं नाव जगभरात झालं आहे. या मोहिमेमुळे मोठा फायदा होणारआहे. हवामान, संरक्षण आणि नकाशा बनविण्यासाठी याचा उपयोग होणार आहे'.

अर्थव्यवस्थेविषयी भाष्य करताना अजित पवार म्हणाले, 'देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन करण्याचं उदिष्ट ठेवलंय. आम्हीही महाराष्टाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही ठरवलं आहे की, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियनची करायची आहे. तसेच इतरांच्या आरोप-प्रत्यारोपांना महत्व न देताना राज्याच्या विकासासाठी कमिटी नेमली आहे,असेही ते म्हणाले.

Ajit Pawar Sharad PAwar
Satara NCP Melava: एनसीपीच्या मेळाव्यात पालकमंत्र्यांवर हल्लाेबाेल; राेहित पवारांच्या प्रश्नावर शंभूराज देसाई बाेलणार का?

अजित पवारांची दिलगिरी

दरम्यान, पत्रकार परिषदेत दिलगिरी देखील व्यक्त केली. अजित पवार म्हणाले,'त्यादिवशी मी चुकून चांद्रयान चंद्रकांत बोललो. यावरून अनेकांनी खिल्ली उडवली. बोलताना माझी चूक झाली. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून अशी चूक व्हायला नको होती. माफी मागून पुढे जायचं अशा मताचा मी आहे, असंही अजित पवार म्हणाले.

मी असे बोललोच नाही : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी अजित पवार असे बोललोच नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नसून भूमिका पक्षविरोधी असल्याचे सांगत अजित पवारांना पुन्हा संधी नसल्याचे मोठे विधानही त्यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com