Supreme Court Hearing on ShivSena: राज्यातील सत्तासंघर्षावर तब्बल अकरा महिन्यानंतर आज (11 मे) निकाल येणार असून, या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहेत. निकालात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता राहणार की जाणार याचे चित्र अवघ्या काही वेळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान निकालापूर्वी अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असून, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची देखील प्रतिक्रिया आली आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे..
राज्याच्या सत्ता संघर्षाच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. निकालाबरोबरच राज्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडताना दिसत आहेत. यावर चंद्रकांत खैरे यांनी बोलताना आमच्याच बाजूने निकाल लावावा अशी मागणी देवाकडे केल्याचे सांगितले आहे. (Latest Marathi News)
साम टीव्हीशी बोलताना खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. ज्यामध्ये "त्यांनी शिंदे हे जादुटोणा करतात. ते गेल्या तीन दिवसांपासून जादुटोणा करत असून त्यांच्या तोंडात एक पांढरा खडा आहे," असे म्हणून खैरे यांनी वेगळेच प्रश्न उपस्थित केले आहेत. खैरे यांच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा उलट सुलट प्रतिक्रियांना उधाण आले आहे. (Maharashtra Political Crisis)
तत्पुर्वी, निकालाच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी होम हवन करत निकाल आपल्याच बाजूने लागावा यासाठी देवाला साकडे घातले आहे. चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या मंदिरात यासाठी विशेष पूजेचे आयोजन केले होते. तर परमेश्वर आपल्याला नक्कीच न्याय देईल असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.