सचिन कदम, प्रतिनिधी
शिवसेना आमदार अपात्रतेवरुन राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर आम्ही त्यांना विधानसभेवर घेवू, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाने भाजपपासून सांभाळून राहावे असा सल्ला दिला होता. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याला अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
"देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) दगाफटका केलाच पण घटक पक्षासोबतही दगाफटका केला. त्यांनी एकनाथ शिंदेंशी दगाबाजी केली आहे त्यामुळे अजित पवार गटाला विनम्र विनंती आहे, कधी तरी एका ताटात आपण जेवलोय. ते शिंदेंना धोका देत आहेत. त्यामुळे संभल के रहो, इस भाजप से.." असा सल्ला सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला होता.
"सुळेंच्या या विधानाला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. कुणी कुणाला फसवले कुणी कुणाला नाही फसवले हे वेगवेगळ्या घटनांमधून समोर आलंय, त्यामुळे संसदरत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये," असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तसेच "सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली असेल तर त्याला भाजप उत्तर देईल, मात्र त्यांनी आम्हाला सल्ला देवू नये, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमची भूमिका ठाम आहे. आम्हालाही थोडं फार राजकारण कळतं, अजिबातच कळत नाही असं नाही.." असंही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.