Supriya Sule Press conference Live SAAM TV
महाराष्ट्र

Ajit Pawar Live News: दादा आणि माझ्यात कधीच वाद होणार नाही - सुप्रिया सुळे

Ajit Pawar at Raj Bhavan: आज अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शामील होण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

अजित पवारांसह ९ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई होणार, याचिका दाखल- जयंत पाटील

महाऱाष्ट्राच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर आम्हाला माहीत झालं. त्याच क्षमी ते अपात्र ठरले. आम्ही अपात्रतेची याचिका काही वेळेआधी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे. इमेलद्वारे पाठवली आहे.

विधानसभा अध्यक्षांना फोन केला, त्यांनी उचलला नाही. त्यांना मेसेज केलाय. व्हॉट्सअॅपवरही कॉपी पाठवली आहे. अपात्रतेची याचिका प्रत्यक्ष देण्याची व्यवस्था केली आहे.

निवडणूक आयोगालाही आम्ही पत्र लिहिलं आहे. पत्राद्वारे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची कृती मान्य नाही. पक्ष ताबा घेण्याचे सांगेल पण आम्ही आहोत. राष्ट्रवादी अस्तित्वात आहे असं आधीच सांगितलं आहे.

शिस्तपालन समितीलाही पत्र लिहिलं होतं. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात सांगितलं. आम्ही त्यानुसार नोटीस पाठवली आहे. विधानसभा अध्यक्षांनी उद्या सकाळी लवकर आम्हाला सुनावणीसाठी बोलावलं पाहिजे. ज्या ९ सदस्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन शपथ घेतली. त्यांच्याविरोधात आम्ही अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांना व्हीपचा अधिकार दिला आहे. ते आता स्वतः अपात्रतेची याचिका त्यांना देण्याचा प्रयत्न असेल. पक्षविरोधी कृती ज्या क्षणी पवार आणि प्रदेशाध्यक्ष अर्थात मला कोणतीही कल्पना न देता कृती केली आहे. आमच्या धोरणांविरोधात जाऊन त्यांनी शपथ घेतली. ज्या क्षणी शपथ घेतली त्या क्षणी ते अपात्र ठरले आहेत.

- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अनेकांचे फोन येताहेत, त्यांना परत यायचंय- जयंत पाटील

पक्षविरोधी कृतीमुळे बंडखोर तात्काळ अपात्र -जयंत पाटील

अपात्रतेची नोटीस पाठवली, जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सदस्यांनी म्हणजे ९ जणांनी पक्षाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना कल्पना न देता पक्ष हिताविरोधात जाऊन शपथ घेतली. ही कृती बेकायदेशीर आहे. बंडखोरांविरोधात कारवाई करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सदस्यांनी म्हणजे ९ जणांनी पक्षाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना कल्पना न देता पक्ष हिताविरोधात जाऊन शपथ घेतली. ही कृती बेकायदेशीर आहे. - जयंत पाटील

भाजप आणि त्यांचे मंंत्री कायम इलेक्शन मोडमध्ये असतात. कामं करत नाहीत, सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र

शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी - सुप्रिया सुळे

सगळं अचानक घडलंय, मला तरी काही माहीत नव्हतं -सुप्रिया सुळे

देशात सातत्याने ICE चा वापर - सुप्रिया सुळेंचा केंद्रावर हल्लाबोल

कोर्टात जाणार नाही, जनतेत जाणार - सुप्रिया सुळे

दादा आणि माझ्यात कधीच वाद होऊ शकत नाही - सुप्रिया सुळे

दादा आणि माझ्यात काही गोष्टींवर चर्चा झाली - सुप्रिया सुळे

शरद पवार यांचं आजचं उत्तर मला ऊर्जा देणारं - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असं पवार साहेबांना विचारलं. त्यावर त्यांचं उत्तर ऐकून मला असं वाटतं की साताऱ्याची सभा आणि पवार साहेबांचं आजचं उत्तर हे कुणालाही उर्जा देणारं आहे. माझ्या स्वतःसाठी सुद्धा - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीला मोठी खिंडार; शरद पवारांचे उद्या शक्ती प्रदर्शन

खा.शरद पवार हजारो कार्यकर्त्यांसह उद्या कराडला जाणार आहेत. आज अजित पवारांनी घेतलेल्या निर्णया विरोधात पवारांनी हा निर्णय घेतलाय. पुण्यातील मोदी बागेतून सकाळी आठच्या सुमारास शरद पवार रवाना होणार आहेत. त्यानंतर ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. समाधीला अभिवादन केल्यानंतर पवार कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

राज्यातल्या राजकारणातील या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरेंनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. नांदा सौख्य भरे... अशी एका वाक्यात आणि सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांचे नाव जाहीर

मुख्य प्रतोद पद आणि विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाडांवर सोपवण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड अजित पवारांसोबत गेले नाहीत. ते अजूनही आमच्यासोबत आहेत त्यामुळे नवे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड असतील, असं शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना जाहीर केलं.

ही गुगली नाही, रॉबरी - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. मला आनंद आहे की, मंत्रीमंडळात त्यांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांना शपथ दिली. म्हणजे त्यांनी हे मान्य केलं की, हे सर्व आरोप खोटे होते. राष्ट्रवादी ही भ्रष्ट्राचारी नाही हे सिद्ध झालं. यामुळे मी पंतप्रधानांचे आभार मानतो, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.

भाजपमधून सातत्याने राष्ट्रवादी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आजच्या बंडखोरीचं श्रेय पंतप्रधान मोदींना द्यावं लागेल. या आधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहाटेच्या शपथ विधीवेळी मी गुगली टाकली होती असं शरद पवार म्हणाले होते. मात्र आता ही गुगली नाही रॉबरी आहे, असं पवारांनी म्हटलंय.

महाराष्ट्राचा ‘दिगू टिपणीस’ झाला - राज ठाकरे

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील 'दिगू टिपणीस' झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.

'यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.

...त्यामुळे मी शिंदे-फडणवीस सकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला; अजित पवारांनी सांगितलं खरं कारण 

विकासाला प्राधान्य देत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. विकास कोणत्या मार्गाने करता येईल याकडे आमचं लक्ष आहे. कोण टीका करतं याचा आम्हाला फरक पडत नाही. महाराष्ट्रात केंद्रीय निधी जास्तीत जास्त कसा मिळवता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आमच्या अनेक आमदार आणि लोकप्रतीनीधींना देखील हा निर्णय मान्य आहे. सर्व निवडणुकांत आम्ही राष्ट्रवादीच्याच नाव आणि चिन्हाखाली निवडणूक लढवणार. त्यामुळे आज आम्ही मंत्रीमंडळात सहभागी झालो आहोत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

भविष्यात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील- रवी राणा

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोडून बाकी सर्व आमदार खासदार भाजप सोबत दिसतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे. येणाऱ्या भविष्यात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील. राज्याचा विकास करायचा असेल तर केंद्राची साथ पाहिजे ती साथ अजित पवार यांना मिळेल. अजित पवार जर भाजपमध्ये गेले तर यामध्ये नवीन समजण्याचं काही कारण नाही.

खिचडीच्या सरकारला काही तथ्य नाही, हे फार काळ टिकणार नाही; अजित पवारांच्या खेळीवर यशोमती ठाकूर यांंचे टीकास्त्र

आम्ही काँग्रेसचे मंडळी आमच्या शब्दासोबत पक्के आहोत. आम्ही जनमताचा असा अपमान कधीच करू शकत नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. या खिचडीच्या सरकारला काही तथ्य नाही, हे फार काळ टिकणार नाही. संविधानाची तोडमोड या महाराष्ट्रात होत आहे. आम्ही संविधानाचा मान धरून सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू.

-माजी मंत्री यशोमती ठाकूर

डबल इंजिन सरकारला ट्रीपल इंजिन जोडण्यात आलं आहे; मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शपथविधीवर आपली प्रतिक्रीया दिली आहे, कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिल्यावर अशा घडामोडी घडतात. आता डबल इंजिनच्या सरकारला ट्रीपल इंजिन जोडण्यात आलं आहे. अजित पवार अतिशय कर्तुत्ववान आहेत त्यामुळे त्यांचे मी स्वागत करतो. या राज्याचा विकास आता अतिशय वेगाने होणार आहे. तातडीने मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

शरद पवारांच्या गुगलीवर सिक्सर! देवेंद्र फडणवीस यांच्या यॉर्करवर राष्ट्रावादीचा त्रिफळा उडाला. उध्दव ठाकरे हिट विकेट आणि संजय राऊत स्वत:च्या पायात अडकून रन आऊट

-केंद्रीय मंत्री नारायण राणे

अखेरीस शिंदे सरकारमध्ये पहिल्या महिला मंत्री

राष्ट्रवादी अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे, बाबूराव अत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

छगन भुजबळांनी घेतली  मंत्रिपदाची शपथ

१९९९ पासून भुजबळ राष्ट्रवादीत आहेत. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ पर्यंत छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री होते. आज अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ विधीनंतर छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

आज सकाळपासूनच अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी चर्चा सुरु होती. अखेर २ जुलै २०२३ रोजी त्यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

फडणवीसांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता

राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पदी अजित पवार शपथ घेण्याची चर्चा सुरु आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांची थेट दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी सरकारला पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.

जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही- संजय राऊत

महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले" मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.

- संजय राऊत

राष्ट्रवादीत फूट पडली आहे - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली आहे. हा संपूर्ण निर्णय अजित पावारांचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत थेट फूट पडलीये, अशी सूचक प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे.

छगन भुजबळ शपथ घेण्याची शक्यता

राज्यातील राजकीय घडमोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसचे अजित पवार आणि छगन भुजबळ हे देखील शपथ घेण्याची शक्यता आहे, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अजित पवारांसोबत 'हे' ९ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?

राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शरद पवारांवर नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. अशात आज अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शामील होण्याची शक्यता आहे.

अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राजभवानावर दाखल झाले आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आज सकाळपासूनच या घडामोडींना वेग आला होता.

राष्ट्रवादीच्या बैठकीला कोण उपस्थित होतं.

खासदार

सुप्रिया सुळे

प्रफुल्ल पटेल

अमोल कोल्हे

आमदार

दिलीप वळसे पाटील

हसन मुश्रीफ

छगन भुजबळ

किरण लहमाटे

निलेश लंके

धनंजय मुंडे

रामराजे निंबाळकर

दौलत दरोडा

मकरंद पाटील

अनुल बेणके

सुनिल टिंगरे

अमोल मिटकरी

अदिती तटकरे

शेखर निकम

इंद्रनील नाईक

अशोक पवार

अनिल पाटील

सरोज अहिरे

यांच्यापैकी ९ आमदार देखील शपथ घेणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

SCROLL FOR NEXT