Police recruitment saam Tv
महाराष्ट्र

Police Recruitment : पोलीस भरतीचा मार्ग मोकळा; १०० टक्के पदं भरण्यास शासनाची मान्यता

पोलीस भरतीची (Police) तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीची (Police) तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, महाराष्ट्र पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झालाय. सरकारकडून याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे. जीआरनुसार, राज्यात पोलिसांची तब्बल ११ हजारांहून अधिक पदं भरली जाणार आहे. (Maharashtra Police Bharti 2022)

कोरोना संकट काळात राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. त्यामुळे या काळात राज्यात कोणतीही शासन भरती (Recruitment) करू नये असा आदेश काढण्यात आला होता. हा निर्णय आतापर्यंत लागू होता. मात्र, गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत ११ हजार ४४३ पोलीस पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यासंबंधी आज ५० टक्क्यांची अट शिथिल झाल्याचं जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण ११ हजार ४४३ पदं भरली जातील. (Police Bharti Latest News)

पोलीस भरतीबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं ५० टक्के भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. रिक्त झालेल ही पदं १०० टक्के भरायला परवानगी मिळाली आहे.

सद्यस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. कोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदं भरण्यात यावीत, असंही या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amol Khatal : नाकर्तेपणामुळे लोकांनी थोरातांना घरी बसवल्याने ते वैफल्यग्रस्त; आमदार अमोल खताळ यांची बाळासाहेब थोरातांवर टिका

Maharashtra Live News Update : - खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला

Moringa Ladoo: ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी खा मोरिंगाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत; शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी? पाहा VIDEO

Maa OTT Release: थिएटरनंतर काजोलचा 'माँ' ओटीटीवर होणार प्रदर्शित; हा हॉरर चित्रपट कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT