मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात केली आक्षेपार्ह पोस्ट, पोलिसांनी आरोपीवर केली मोठी कारवाई

मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह टीका आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
eknath shinde news
eknath shinde newssaam tv
Published On

रश्मी पुराणीक

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी फिर्याद दिली असून @bhujangashetti ट्विटर हॅंडलच्या चालकावर भादवी कलम १५३ (अ),५००,५०५ (२)अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Eknath Shinde latest News Update)

eknath shinde news
Teachers Dress Code: जीन्स, टीशर्ट, घट्ट कपडे घालून शिकवण्यास मनाई; नियम मोडणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई होणार

साळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदर ट्विटर हॅंडलने (twitter) समाजात असंतोष निर्माण होईल,या उद्देशाने ११ ते १४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान आक्षेपार्ह, महिलांना अपमानास्पद, लज्जास्पद आणि आपत्ती निर्माण होईल,असा मजकूर पोस्ट केलेला आहे. या संदर्भात माहिती देताना साळी म्हणाले, मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह टीका आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.

त्यांना कडक कायदेशीर भाषेतच उत्तर दिले जाईल.समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी काही घटक यात जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असण्यातच शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी.

eknath shinde news
T20 World Cup 2022 : जसप्रीत बुमराहच्या जागेवर कोण खेळणार? बीसीसीआयने दिली मोठी माहिती

महाराष्ट्र सायबर अधिक्षकांकडे कडक कारवाईची युवा सेनेची मागणी

सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी युवा सेना सचिव किरण साळी यांनी राज्याच्या सायबर सेलचे पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांच्याकडे केली आहे. कारवाईच्या मागणीचे पत्र साळी यांनी शिंत्रे यांना दिले असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन शिंत्रे यांनी दिले आहे.़

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com