Teachers Dress Code: जीन्स, टीशर्ट, घट्ट कपडे घालून शिकवण्यास मनाई; नियम मोडणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई होणार

शिक्षकांनी नियमांचं उल्लघन केल्यास बढती, पगारवाढ आणि बोनस इत्यादींवर नकारात्मक परिणाम होईल.
Teacher (File Photo)
Teacher (File Photo)saam tv
Published On

लखनौ : शाळेत जीन्स आणि टी-शर्ट घालून शाळेत जाणे शिक्षकांना (Teacher) महागात पडू शकते. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शिक्षकांना जिल्हा निरीक्षकांनी (DIOS) एक आदेश जारी केला आहे. या आदेशात सहावी ते बारावीपर्यंतच्या कोणत्याही शाळेत जीन्स आणि टी-शर्ट किंवा घट्ट कपडे परिधान करून आलेल्या शिक्षकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

Teacher (File Photo)
दिवाळीच्या तोंडावर ST प्रवास महागणार, महामंडळाकडून भाडेवाढ जाहीर; 'या' गाड्यांना सूट

मुझफ्फरनगर डीआयओएस राजेंद्र कुमार यांनी शाळेच्या शिस्तीबाबत हे आदेश जारी केला आहे. राजेंद्र कुमार यांनी याबाबत म्हटलं की, आता शाळांमध्ये (School) शिक्षकांना फॅन्सी, घट्ट आणि जीन्स, टी-शर्ट घालून येता येणार नाहीत. या आदेशाचे कुणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

राजेंद्र कुमार यांनी महिला शिक्षकांसाठीही आदेश दिले आहेत. जर एखादी महिला शिक्षिका साडी किंवा सूट घालून शाळेत आली तर तिनेही विनयशील वागावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. शाळेतील मुले शिक्षकांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर चुकीचा परिणाम होऊ नये ही आपली जबाबदारी आहे, असंही त्यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

Teacher (File Photo)
Thane News : रिक्षाचालकाने विद्यार्थिनीची छेड काढत फरपटत नेलं, ठाणे स्टेशन परिसरातील धक्कादायक प्रकार

आदेशाचे पालन न केल्यास विभागाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. कारवाईपूर्वी आधी इशारा दिला जाईल. मात्र जर कुणी चूक सुधारली नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. याचा बढती, पगारवाढ आणि बोनस इत्यादींवर नकारात्मक परिणाम होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com