दिवाळीच्या तोंडावर ST प्रवास महागणार, महामंडळाकडून भाडेवाढ जाहीर; 'या' गाड्यांना सूट

यंदाच्या दिवाळी (Diwali) सणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे या वर्षीही एसटी प्रवासासाठी भाडेवाढ करण्यात आली आहे.
MSRTC Bus News
MSRTC Bus NewsSaam TV

मुंबई: एसटी महामंडळाच्या (MSRTC Bus) परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानूसार यंदाच्या दिवाळी (Diwali) सणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे या वर्षीही एसटी प्रवासासाठी भाडेवाढ करण्यात आली आहे.

त्यानुसार दि. २० ऑक्टोंबर २०२२ व २१ ऑक्टोंबर २०२२ रोजीच्या मध्यरात्रीनंतरचा प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. तर ही भाडेवाड ३१ ऑक्टोंबर, २०२२ पर्यंत लागू राहणार आहे.

पाहा व्हिडीओ -

सदर भाडेवाढ ही साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नसल्याचंही महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

MSRTC Bus News
Rain Updates: राज्यभरात पावसाची जोरदार बॅटींग; मुंबईसह ठाण्यात साचलं पाणी, पुणेकरांचीही तारांबळ

ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे , त्या प्रवाशाकडून वाहकाद्वारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. तथापि, ही भाडेवाढ एस.टी. च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेबर पासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी. महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com