Maharashtra Heatwave Red Zone Alert:  Saam TV Marathi
महाराष्ट्र

घराबाहेर पडताय सावधान! महाराष्ट्र 'रेड झोन'मध्ये; काय करावे? काय करू नये?

Maharashtra weather today heatwave : महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. राज्य ‘रेड झोन’मध्ये असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. अनेक शहराचे तापमान ४४°C पार आहे. जाणून घ्या काय करावे आणि काय टाळावे.

Namdeo Kumbhar

Maharashtra heatwave red zone warning details : उन्हाचा कडाका आता अधिकच तीव्र झाला असून राज्य उष्णतेच्या 'रेड झोन'मध्ये आले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांचा समावेश 'अति उच्च उष्णता धोका' श्रेणीत करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्रासाठी पुढील ४ दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. (Maharashtra Heatwave Red Zone Alert )

हवामान खात्याच्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवसांत तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तर विदर्भासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असून तिथे तापमानाचा पारा ३ अंशांनी चढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातही उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. पुढील दोन दिवस पुण्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांचा समावेश 'उच्च जोखीम श्रेणी'मध्ये करण्यात आल्याने दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे संकेत मिळत आहेत.

राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिलदरम्यान, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १५ ते १७ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान -

विदर्भातील सर्वच जिल्ह्याचा पारा 42 च्या पुढे

अकोला - 44.2

अमरावती - 44

बुलढाणा - 42.4

चंद्रपूर - 42.6

गोदीया - 42

नागपूर - 43.4

वाशीम - 42.6

वर्धा - 43.9

यवतमाळ - 42.8

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्याचा तापमानाचा पारा 41 च्या पुढे

धराशिव - 41

संभाजीनगर - 41

परभणी- 42

बीड - 43

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याचा तापमानाचा पारा 40 अंशावर

पुणे - 41.8

जळगाव - 42.8

सांगली - 41.8

सातारा - 40.9

सोलापूर - 43.9

मालेगाव - 43.2

काय करावे, काय करू नये?

उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी व ORS घ्यावे, हलके व सैल कपडे वापरावेत तसेच बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. सावलीत विश्रांती घेणे व घरात राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेष्ठ नागरिक व मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, मद्यपान व कॅफिनयुक्त पेये टाळावीत आणि उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळावे. लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT