Maharashtra Weather Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चिन्हं! हवामान खात्याचा ११ जिल्ह्यांना इशारा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हीट’ कायम आहे. अशातच आज मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सांगली, सोलापूर, लातूर, नांदेडसह ११ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हीट’चा त्रास कायम आहे

  • आज मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे

  • हवामान खात्याने ११ जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ दिला आहे

  • अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांचा परिणाम हवामानावर होत आहे

नागरिकांनो लक्ष द्या! पाऊस गेला म्हणून जर तुम्ही घराबाहेर पडताना छत्री घरी ठेवून जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. राज्यभरात अनेक ठिकाणी गेले काही दिवस पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे बहुतांश भागातून ‘ऑक्टोबर हीट’चा त्रास कायम आहे. मात्र आता महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान असून, आज मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून, मोजक्या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर, तसेच बंगालच्या उपसागरात तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात विजांसह पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे.

काल म्हणजेच सोमवारी सकाळपर्यंत राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तीव्र ऊन आणि उकाडा कायम होता. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंशांपार असून, दुपारच्या वेळी उन्हाची झळ अधिक तापदायक ठरली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर आणि सांताक्रुझ येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार होत असून, आज सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT