Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो आताच करा 'हे' काम, नाहीतर फेब्रुवारीपासून ₹ १५०० येणं होईल बंद

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Update: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्यात ३००० रुपये जमा होणार आहेत. पण ज्या लाडकींनी ई-केवायसी केली नाही त्यांचे पैसे येणं बंद होणार आहे.

Priya More

Summary -

  • लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

  • ई-केवायसी न केल्यास फेब्रुवारीपासून १५०० रुपये मिळणं थांबणार

  • राज्यातील ८० लाख महिलांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही

  • नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हफ्ता याच महिन्यात मिळणार

  • लाडकींच्या खात्यावर एकाच वेळी ३००० रुपये जमा होणार

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हफ्ता एकत्रित मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील ८० लाख महिलांनी अद्यापही ई- केवायसी केलेली नाही. या लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ई केवायसी करावी यासाठी सरकारकडून मुदतवाढही देण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून ई- केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांनी ईकेवायसी केली नसेल अशा महिलांचा योजनेचे पैसे येणं बंद होणार अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

राज्यातील लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठं गिफ्ट मिळणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. सरकार लाडक्या बहिणींना नवीन वर्षांचे गिफ्ट आताच म्हणजे डिसेंबर महिन्यात देण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील. म्हणजेच एक नाही तर दोन हफ्त्याचे पैसे लाडकींना खात्यात एकत्र जमा होणार आहे. त्यामुळे लाडकींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता मिळाला नाही. डिसेंबर महिना सुरू होऊन ९ दिवस झाले तरी लाडकींच्या खात्यात पैसे आले नाही त्यामुळे लाडक्या बहिणी या पैशाची वाट पाहत होत्या. पण आता लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबरच नाही तर डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे देखील पैसे मिळणार आहेत. लाडकींच्या खात्यात दोन्ही महिन्यांच्या हफ्त्याचे ३००० रुपये जमा होतील. पण ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही त्यांनी हे काम करणे गरजेचे आहे. कारण हे काम पूर्ण न झाल्यास त्यांच्या खात्यात पैसे येणं बंद होईल.

घर बसल्या ई- केवायसी कशी करायची?

- सर्वात आधी ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा.

- होम पेजवर दिसणाऱ्या ई-केवायसीवर क्लिक करा.

- ई-केवायसी फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थी महिलांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

- आधार ऑथिंटिकेशनसाठी सहमती द्या.

- ओटीपीवर क्लिक करा.

- आधार कार्डला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.

- हा ओटीपी सबमिट करा.

- ईकेवायसी आधीच झाली असेल तर तसा मॅसेज देखील तुम्हाला येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT