Chandrashekhar Bawankule  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra New District: राज्यात नवीन २१ जिल्हे तयार होणार का? महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले...

Chandrashekhar Bawankule: सध्या सोशल मीडियावर राज्यातील नवीन जिल्ह्यासंदर्भात पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये '२६ जानेवारीनंतर अस्तित्वात येणार नवीन २१ जिल्हे.' , असे लिहिले आहे. यावर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

Priya More

राज्यात नवीन जिल्हे होणार अशा आशयाची एक यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाही असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. मात्र जिल्हाधिकाऱ्यांवरचा वाढता ताण हा मात्र कमी होणार आहे. त्यासाठी काही जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याचे आस्थापना असा प्रस्ताव महसूल विभागाकडे असल्याचे बावनकुळे यांनी नागपूरमध्ये सांगितलं.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'राज्यात नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे आलेला नाही. पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो. पण अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना १०० दिवसांच्या आत उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत.', अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

नागपूर जिल्ह्यातील काटोल, पुणे येथील मावळ आणि बारामती, संभाजी नगर, या जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना नेमण्याचा प्रस्ताव १०० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा विचार महसूल विभागाकडून केला जात असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

नवीन जिल्हे होण्यासंदर्भातला सध्या कुठलाही प्रस्ताव नसून २०१७ मध्ये होणारी जनगणना आहे त्यानंतर काही प्रस्ताव येऊ शकतात असेही बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर राज्यातील नवीन जिल्ह्यासंदर्भात जी पोस्ट व्हायरल होत आहे त्यामध्ये असे लिहिले आहे की, '२६ जानेवारीनंतर अस्तित्वात येणार नवीन २१ जिल्हे.' ही सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर राज्यभर जोरदार चर्चा होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सामुहिक योगासनांचा सराव

Vat Purnima 2026 : ना मैदा, ना गहू; यंदा वटपौर्णिमेला बनवा फणसाची पुरी, एक घास खाताच नवरोबा खुश

Diabetes control: आहारातील हे ३ बदल करतील मधुमेहाचा धोका कमी

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT