Jitendra Awhad On Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Jitendra Awhad News: 'धमक होती तर नवीन पक्ष काढा, कर्तृत्व सिद्ध करा..' आव्हाडांचे अजित पवारांना थेट आव्हान; जुना VIDEO शेअर करत टीकास्त्र

Sharad Pawar Vs Ajit Pawar: राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निर्धार मेळावा कर्जमध्ये पार पडला. या मेळाव्यातून अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल करताना अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले.

Gangappa Pujari

Maharashtra NCP Crisis:

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निर्धार मेळावा कर्जमध्ये पार पडला. या मेळाव्यातून अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल करताना अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. तसेच आगामी निवडणुकांंमध्ये पवार विरुद्ध पवार असा थेट सामना पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेतही दिलेत. अजित पवारांच्या या टीकेनंतर शरद पवार गटही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा जुना व्हिडिओ ट्वीट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या एक्स अकाउंटवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जुना व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. तुमच्यामध्ये धमक असेल तर दुसरा पक्ष काढावा.. असा सल्ला ते शिंदेंना देत आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या याच भाषणाची क्लिप पोस्ट करत आव्हाडांनी टीका केलीय. "दादा, तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वत:ची ओळख करुन देताना म्हणत आलात की, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, प्रसंगी वाटेल ती किमंत मोजावी लागली तरी! शिवसेना फुटल्यानंतर केलेल्या भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्री मंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना दिलेला हा सल्ला होता," असे जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

"या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म आदरणीय शरदचंद्रजी पावर साहेबांनी दिला, त्याच पालन पोषण ही पवार साहेबांनी केलं, त्याच संगोपन पुढे पवार साहेबांनीच केल. राष्ट्रवादी पक्ष वाढला हा देखील पवार साहेबांमुळेच, आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात. मग, जस आपण म्हटलात तस घ्याना आणि एक नवीन पक्ष काढा, नविन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तुत्व सिद्ध करुन दाखवा," असे आव्हानही त्यांनी अजित पवारांना दिलेय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT