Excise department officials conduct inspections at hotels and roadside dhabas ahead of New Year celebrations amid election code in Maharashtra. Saam TV Marathi News
महाराष्ट्र

आचारसंहिता लागली! ३१ डिसेंबरची पार्टी करण्यापूर्वी नक्की वाचा, अन्यथा मद्यपींना होणार अटक, वाचा नियम काय सांगतो

Model code impact on New Year celebrations : महापालिका निवडणुकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्टीदरम्यान अवैध मद्यविक्री आणि मद्यपान केल्यास ढाबा चालक व मद्यपींवर कठोर कारवाई होणार आहे.

Namdeo Kumbhar

Dec 31 liquor party rules Maharashtra : मुंबई, पुणे, सोलापूर अन् नाशिकसह राज्यातील २९ महापालिकेसाठी निवडणुकीचा धुरळा उडालाय. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. प्रचार अन् सभांचा धडाका सुरू होईल. राजकीय रणधुमाळी सुरू असतानाच ३१ डिसेंबर अवघ्या दोन आठवड्यावर आलाय. वर्षाच्या शेवटच्या दिवशी अनेकजण दारू पार्ट्या करतात, त्यासाठी ढाबा अन् हॉटेल अथवा रिसॉर्टवर जाण्याचे बेत आखले गेलेत. पण थांबा... ३१ डिसेंबर रोजी पार्टी करण्याआधी मद्यपींनी दारू पिण्याचा परवानगी काढवी. कारण, अवैध मद्यविक्री अन् मद्यप्राशन करणाऱ्यांविरोत गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. त्यामुळे ढाबा अन् इतर ठिकाणी दारू पार्टी कऱण्याआधी दहा वेळा विचार करा, कचाट्यात सापडल्यास मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल. (New Year celebrations amid election code in Maharashtra)

वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच ३१ डिसेंबर हा दिवस अनेकजण जंगी सेलिब्रिशेन करतात. पण यंदा निवडणुका असल्यामुळे कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. निवडणुका अन् ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ढाब्यांवरील पार्टी, अवैध मद्यविक्री, वाहतूक, साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष आहे. हॉटेल अथवा ढाब्यांवर कोणी मद्यविक्री करून मद्यपींची सोय करीत असल्यास कारवाई होईल. हॉटेल, ढाबा मालक आणि मद्यपींवरही गुन्हे दाखल केले जातील.

नियमांनुसार, परमीट बार सोडून इतर ठिकाणी परवानगी नसताना मद्यविक्री, मद्यपान करता येत नाही. पण अनेकदा राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे, हॉटेलवर मद्यपींसाठी अवैध दारूची सोय करून दिली जाते. पुणे ग्रामीण, सोलापूर, ठाणे, नाशिकसह सोलापूरमध्येही अनेक बिअर शॉपी, हॉटेलमध्ये देखील असेच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता संबंधित ढाबा हॉटेल चालक व तेथील मद्यपींवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. या प्रकरणात त्या व्यक्तीला अटकही होऊ शकते.

परवानगी नसताना मद्यविक्री केली तर दारूबंदी न्यायालयात ढाबा चालकास पाच ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तर मद्यपीस एक ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जातो. त्यामुळे ३१ डिसेंबरला पार्टी अथवा सेलीब्रेशन करण्याचा विचार करत असताल तर मद्यपींनी एक रुपयात ऑनलाइन परवाना काढून घ्यावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. सकाळने याबाबतचे वृत्त दिलेय.

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आणि ३१ डिसेंबर या पार्श्वभूमीवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पथके वाढविण्यात आली आहेत. अवैध दारूविक्री, वाहतूक, साठ्यासंदर्भात काही माहिती असल्यास १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्सअॅप क्रमांकांवर तक्रार करता येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी आवाहन केलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT