Maharashtra Municipal Election Result Saam tv
महाराष्ट्र

Municipal Election Result: २९ महापालिकांचा निकाल लागला, आता महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी? तारीख आली समोर

Maharashtra Municipal Election Result: राज्यातील २९ महानगर पालिकांचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर कोण होणार याकडे. महापौरपदासाठी आरक्षण सोडत अद्याप निघाली नाही. ही सोडत कधी निघणार आहे याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • राज्यातील २९ महापालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर

  • महापौर पदासाठी आरक्षण सोडत पुढील आठवड्यात

  • जानेवारी अखेरीस महापौर निवडीची शक्यता

  • मुंबईत भाजपचा महापौर होणार हे निश्चित

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूरसह राज्यातील २९ महानगर पालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे म्हणजे महापौर कोण होणार आहे. आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौर पदाचा चेहरा ठरणार आहे. महापौरपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नाही त्यामुळे नगरसेवकांची उत्सुकता वाढली आहे. पुढील आठवड्यात नगर विकास खाते महापौर सोडत काढणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तर जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापौरपदासाठी सोडतून आरक्षण निश्चित केले जाते. सर्वसाधारण पुरूष किंवा महिला, ओबीसी, अनुसूचित जाती व जमाती अशा क्रमाने आरक्षण सोडत काढली जाते. आधी जर सर्वसाधारण गटासाठी महापौरपद असल्यास पुढच्या वेळी म्हणजे आता तो गट वगळून अन्य प्रवर्गाला आरक्षण दिले जाते. जेणेकरून सर्व गटांना सर्वोच्चपद भूषविण्याची संधी मिळेल. आता सर्व २९ महापालिकांचे निकाल लागले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष महापौर पदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. ही आरक्षणाची सोडत लवकरच जाहीर केली जाईल. त्यानंतपर राज्यातील सर्व २९ महापालिकांना महापौर मिळेल.

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या मुंबई महानगर पालिकेवर महायुतीची सत्ता आली. २२७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे एकूण ११८ सदस्य निवडून आले. भाजपचे सर्वाधिक ८९ नगरसेवक विजयी झाले आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट हा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. ठाकरेसेनेचे ६५ नगरसेवक विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाचे २९ नगरसेवक विजयी झाले. त्यानंतर मनसे ६, राष्ट्रवादी शरद पवार गट १, राष्ट्रवादी अजित पवार गट ३, काँग्रेस २४, मनसे ६, इतर २ आणि एमआयएम ८ जागांवर विजयी झाले. मुंबईत भाजपने सर्वात जास्त जागा मिळवल्यामुळे भाजपचाच महापौर होणार हे निश्चित आहे.

राज्यातील २९ महानगर पालिकांमध्ये सर्वात जास्त उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत. भाजप १४२५ उमेदवार विजयी झाले. त्यापाठोपाठ सर्वात जास्त ३९९ उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे विजयी झाले. त्यानंतर काँग्रेसचे ३२४, राष्ट्रवादी अजित पवार गट १६७, शिवसेना ठाकरे गट १५५, राष्ट्रवादी शरद पवार गट ३६ , मनसे १३, बहुजन समाजवादी पार्टी ६ आणि एमआयएमचे १२५ उमेदवार विजयी झाले. यानुसार भाजपचे राज्यात अर्ध्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपने या विजयानंतर राज्यभर एकच जल्लोष केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आंबेडकरवादी समाज रस्त्यावर.

महानगरपालिकेच्या राजकारणात GEN-Z चा दमदार प्रवेश, 22 वर्षाच्या तरुण नगरसेवकांकडून नव्या युगाची सुरुवात

Lord Shiva idol crematorium: स्मशानात भगवान शिव यांची मूर्ती का असते?

मोठी बातमी! पवारविरुद्ध पवार संघर्ष संपला; महानगरपालिकेनंतर ZP निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

Saree With Jacket : Winter फॅशन! थंडीत साडीसोबत स्टाइल करा जॅकेट, एकदम क्लासी लूक येईल

SCROLL FOR NEXT