महापालिका निवडणुकांत GEN Z चा जोरदार प्रभाव
मुंबईसह राज्यभर तरुण नगरसेवकांची निवड
बीएमसीमध्ये 30 वर्षांखालील 12 नगरसेवक
महापालिका निवडणुकीच्या निकालात नव्या पर्वाची नांदी झालीय. घराणेशाही आणि अनुभवी चेहऱ्यांची चर्चा होत असतानाच मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये GEN Z नगरसेवक निवडून आलेत. मुंबईकरांनी 12 GEN Z नगरसेवकांना निवडून दिलयं... ज्याचं वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे. त्यामुळे बीएमसीत तरुणाईचा आवाज घुमणार आहे.
BMCमध्ये Gen Zची एन्ट्री - हेडर
अदिती खुरसुंगे – वय 29, शिंदेसेना, वॉर्ड क्रमांक 11 (बोरिवली पूर्व)
निर्मिती कणाडे – वय 25, शिंदेसेना, वॉर्ड क्रमांक 133 (घाटकोपर पूर्व)
समान आजमी – वय 29, काँग्रेस, वॉर्ड क्रमांक 167 (कुर्ला पश्चिम)
दक्षता कवटणकर – वय 28, भाजप, वॉर्ड क्रमांक 19 (कांदिवली पश्चिम)
दिशा यादव – वय 29, भाजप, वॉर्ड क्रमांक 80 (अंधेरी पूर्व)
ऋतेश राय – वय 29, शिंदेसेना, वॉर्ड क्रमांक 86 (अंधेरी पूर्व)
अपेक्षा खांडेकर – वय 29, शिंदेसेना, वॉर्ड क्रमांक 142 (मानखुर्द)
हैदर अली शेख – वय 28, काँग्रेस, वॉर्ड क्रमांक 34 (मालाड पश्चिम)
आयेशा खान – वय 28, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), वॉर्ड क्रमांक 96 (वांद्रे पूर्व)
कशिश फुलवरीया – वय 22, भाजप, वॉर्ड क्रमांक 151 (चेंबूर / कुर्ला पूर्व)
अंकित प्रभू – वय 29, ठाकरेसेना, वॉर्ड क्रमांक 54 (गोरेगाव पूर्व)
राजुल पाटील – वय 29, ठाकरेसेना, वॉर्ड क्रमांक 114 (भांडुप पश्चिम)
उच्चशिक्षित डॉक्टर, एमबीए आणि डिझायनर असलेले हे तरुण नगरसेवक वॉर्डातील प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज झालेत. 1997 – 2012 दरम्यान जन्मलेल्या पिढीला जेन झेड म्हणतात.. तरी राज्यात किती जेन झी नगरसेवक निवडून आलेत ते ही पाहूयात.
महापालिकांवर 'GEN Z'चा झेंडा
नवी मुंबई- 7
मीरा- भाईंदर- 1
वसई विरार- 1
पुणे- 4
पिंपरी-चिंचवड- 3
अहिल्यानगर- 3
जळगाव- 10
नवीन जनरेशनच्या लोकप्रतिनिधींकडे शहराचा विकास करण्यासाठी 'व्हिजन' आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून वॉर्डातील समस्या सोडवण्यासाठी हे तरुण प्रयत्न करणार आहेत.मुळात राजकारणात 'अनुभव' महत्त्वाचा असतोच. पण 'जेन झेड' नगरसेवकांच्या या दमदार एन्ट्रीने प्रशासकीय यंत्रणेतही नवा उत्साह आणि आधुनिक विचार येण्याची शक्यता आहे. डिजिटल युगात वाढलेली ही पिढी महापालिका क्षेत्रातील नागरीकांच्या समस्या कशा सोडवते, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.