MSRTC has made NCMC Smart Cards mandatory for women, senior citizens and Amrit senior citizens from August 1, 2026 saam tv
महाराष्ट्र

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

MSRTC Compulsory NCMC Smart Cards : एसटी (MSRTC) ने १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि 'अमृत' ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. एसटी सेवांमध्ये पारदर्शकता, सुविधा आणि डिजिटल व्यवहार वाढवणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे.

Bharat Jadhav

  • महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक.

  • एसटी महामंडळाने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतला.

  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निर्णयाची अधिकृत घोषणा केली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एसटी बसच्या प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMCस्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यभरात एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे.

आजपर्यंत राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आलेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड्स लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येणार आहे. राज्यभरात 4 हजारांहून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्र कार्यरत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावेत, यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेत.

निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा केंद्रांचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT