satara  Saam tv
महाराष्ट्र

साताऱ्यातील पठ्ठ्याने चक्क डोंगर फोडलाय; 67 वर्षांचा हा माऊंटन मॅन कोण?

बायकोसाठी डोंगर फोडणारा दशरथ मांझी तुम्हाला माहिती असेलच...मात्र महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ग्रामस्थांच्या सुविधेसाठी एका माऊंटन मॅननं चक्क डोगंर फोडलाय.. 67 वर्षांचा हा माऊंटन मॅन कोण आहे? त्यानं डोंगर का फोडला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

Saam Tv

जिद्द आणि चिकाटी असेल, तर माणूस डोंगरही हलवू शकतो, हे आपण ऐकलंय... मात्र साताऱ्याच्या एका 67 वर्षांच्या बहाद्दराने हे प्रत्यक्षात करून दाखवलंय! एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा पराक्रम करंडी गावच्या अशोक जाधव यांनी केला आहे. प्रशासनाची वाट न पाहता, कोणाचीही मदत न घेता, केवळ एका टिकाव आणि फावड्याच्या जोरावर त्यांनी साडेतीन किलोमीटरचा डोंगर पोखरून रस्ता तयार केलाय.

सातारा जिल्ह्यातील श्री सिलोबा गड... निसर्गरम्य परिसर, मात्र गडावर जाण्यासाठी असलेली वाट अत्यंत खडतर, निसरडी आणि जीवघेणी होती. वृद्ध भाविकांना तर तिथे जाणं म्हणजे एक दिव्यच होतं. पण आज चित्र बदललंय. हा रस्ता आता स्वच्छ, सपाट आणि चालण्यायोग्य झालाय. हा चमत्कार कोणत्याही सरकारी यंत्रणेने नाही, तर 67 वर्षांचे माऊंनटन मॅन अशोक जाधव यांच्या अथक प्रत्यत्नांमुळे शक्य झालाय.

अशोक जाधव यांना ना प्रसिद्धीची हाव होती, ना पैशाचा लोभ. दररोज सकाळी 6 वाजता हातात टिकाव, फावडा आणि खोरे घेऊन ते डोंगराकडे निघायचं...आणि रोज किमान 50 फूट रस्ता तयार करायचा, हा त्यांचा दिनक्रम आणि निर्धारही... घरातून सोबत घेतलेल्या बाटलीतलं पाणी संपलं की मगच जाधव घराकडे परतायचे...त्यांच्या या कामाचं आता संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होतंय.

ज्या वयात माणसं निवृत्तीचं आणि आरामाचं जीवन जगतात त्या वयात जाधव यांनी डोंगर फोडण्याचं आव्हान पेललं. त्यांचं हे काम इतरांसाठी प्रेरणादायी तर आहेच...मात्र सरकारी यंत्रणांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारही आहे. अशोक जाधव यांनी दाखवून दिलंय की, सरकारी निधीची किंवा मोठ्या यंत्रणेची वाट पाहण्यापेक्षा, मनात जर जिद्द असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात.

आणि अशवेळी आठवतात त्या दुष्यंत कुमारांच्या कवितेतल्या ओळी....कैसे आकाश में सुराख नही हो सकता...एक पत्थर तो तबिअत से उछालो यारो...त्यामुळे साताऱ्याच्या या माऊंटन मॅनला 'साम टीव्ही'चा सलाम!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; रितेश भाऊ ठरला बॉक्स ऑफिसच किंग, वाचा कलेक्शन

Accident News : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ३० प्रवाशांना घेऊन जाणारी डबल डेकर उलटली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: चांदवडमध्ये आंदोलनादरम्यान गोंधळ

LPG Rules 2026 Update : LPG नियमात पुन्हा बदल, पाईप गॅस कनेक्शन असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच

गणेश भक्तासांठी आनंदाची बातमी! सिद्धिविनायक मंदिराचा होणार कायापालट; पाहा कसं दिसेल मंदिर?

SCROLL FOR NEXT