Monsoon in Maharashtra Today
Monsoon in Maharashtra Today Saam TV
महाराष्ट्र

Monsoon Weather: बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; मान्सूनबाबत आली मोठी अपडेट

साम टिव्ही ब्युरो

Monsoon in Maharashtra Today: राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. अवकाळीचं हे संकट कधी दूर होईल याची वाट शेतकरी पाहत असताना, दुसरीकडे एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.  (Latest Marathi News)

दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या मान्सून अंदाजाची प्रतीक्षा असते. सगळे शेतकरी हवामान विभागाचा नेमका काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज सोमवारी स्कायमेटनं वर्तवला होता. मात्र, आता हवामान तज्ज्ञांनी एक चिंता व्यक्त केली आहे. (Breaking Marathi News)

राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.मे महिना सुरू झाली तरी राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे.

अनेक भागात झालेल्या गारपीटीने बळीराजा त्रस्त झाला आहे. अवकाळीचं हे संकट कधी दूर होईल याची वाट शेतकरी पाहत मान्सून लांबणीवर पडू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मे महिन्यात सुरू असलेल्या पावसाचा फटका मान्सूनवर होऊ शकतो. अशी भीतीही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मान्सूनबाबत भारतीय हवामानशास्त्राचा अंदाज

काही दिवसांपूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Rain Alert) मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला होता. देशात यंदा सामान्य पाऊस राहणार. यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली होती. जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहणार आहे. मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव राहणार असून त्याचा परिणाम मान्सूनच्या उत्तरार्धात दिसेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

SCROLL FOR NEXT