MAHARASHTRA RAIN ALERT: IMD ISSUES YELLOW ALERT FOR 28 DISTRICTS AS MONSOON ADVANCES SLOWLY Saam Tv
महाराष्ट्र

Monsoon Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; २८ जिल्ह्यांना यलो अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू आहे. आज हवामान विभागाने २८ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांना यलो अलर्ट

  • अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता

  • मान्सूनची वाटचाल अद्याप संथ गतीने

  • मुंबईतील मान्सूनचा मुहूर्त चुकला

Maharashtra Weather Rain Alert News राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्यापही मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये उकाडा कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा महाराष्ट्रात पाऊस कमी पडणार असून पुढील काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रभर दाखल होणार आहे. यंदा मान्सूनला येण्यासाठी उशीर झाल्याने नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागत आहे. आज राज्यातील २८ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान मान्सून संथ गतीने पुढे सरकत असल्याचे IMD ने सांगितले.

हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, आज दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. यासोबतच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दिवसभर उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी किंवा गडगडाटासह पाऊस पडू शकतो.

हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी (Ratnagiri Rain Update) , सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Monsoon) गुरुवारी कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरी तसेच पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांमध्ये आणखी प्रगती केली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्रासह देशातील आणखी काही भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : शिंदे सेनेच्या आणखी एका नगरसेवकाच पद धोक्यात, अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेने बजावली नोटीस

Maharashtra News Live Update : एसबीआय बँकेत दिवसाढवळ्या शेतकऱ्याचे ३५ हजार रुपये लंपास

Beetroot Rice Recipe : रोजच्या भाताला द्या भन्नाट ट्विस्ट! झटपट बनवा चविष्ट बीटरूट राईस, चेहऱ्यावरही दिसेल गुलाबी चमक

दोन दिवसांपूर्वी ताप, अचानक प्रकृती खालावली; भाजप आमदाराचे निधन

Pune Tourism : बॅग भरो निकल पडो! वन डे ट्रिपमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ५ स्पॉट्स

SCROLL FOR NEXT