Ravikant Tupkar, Maharashtra Assembly , Maharashtra Pavsali Adhivishan.  Saam Tv
महाराष्ट्र

विधानभवना बाहेर राडा ! 'सामान्य जनता काॅलर पकडून तुम्हांला रस्त्यावर मारेल, लक्षात ठेवा'

उघड माथ्यानं सांगताहेत आम्ही मारलं, लाज वाटली पाहिजे त्यांना असेही रवीकांत तुपकर यांनी नमूद केले.

संजय जाधव

बुलढाणा : विधानभवनाच्या पाय-यांवर आज आमदारांनी राडा घातला. त्यानंतर राज्यातील विविध पक्षातील नेत्यांसह जनता आमदारांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करु लागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी नळावरच्या भांडणासारखे भांडण आज विधानभवन परिसरात झालं. ही शाेकांतिका म्हणावी लागेल. महाराष्ट्रातील प्रश्नांकडं दुर्लक्ष करुन ही आमदार मंडळी भांडत असतील तर अशा राज्यकर्त्यांना जनता रस्त्यावर खेचून मारेल असे तुपकरांनी म्हटलं.

रवीकांत तुपकर म्हणाले विधानभवनात मारामा-या करणा-या लाेकप्रतिनिधींना थाेडी तरी लाज वाटली पाहिजे. सामान्य जनतेनं आपल्या कशासाठी निवडून दिलं आहे. सामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडावे यासाठी तुम्हांला पाठविले आहे आणि तुम्ही नऴावरच्या अड्ड्या सारखा तिथं भांडत आहेत. ज्यांच्याकडं आम्ही अपेक्षेने पाहयाचं ते लहानपाेरांसारखं भांडत आहेत. ही किती लाजिरवणी गाेष्ट म्हणावी लागेल.

राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात आेला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी हाेत आहे. मंत्रालयासमारे (mantralay) शेतकरी (farmer) आत्मदहनाचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याकडं दुर्लक्ष करुन हे लाेक आपसापात भांडत आहेत.

हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. इथून पुढं तुमचा अतिरेक झाला तर सामान्य जनता तुमची काॅलर पकडून तुम्हांला रस्त्यावर खेचून मारेल, लक्षात ठेवा असंही तुपकरांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

SCROLL FOR NEXT