Dark clouds over farmland as farmers await monsoon rains amid deficit forecast saam tv
महाराष्ट्र

राज्यात यंदा कमी पाऊस पडणार? सरासरीच्या केवळ 90 टक्के पावसाचा अंदाज

Monsoon Alert: आधीच अवकाळी पाऊस आणि कडक उन्हाच्या चटक्याने होरपळलेल्या शेतकऱ्यावर आता 'अस्मानी संकटाची' टांगती तलवार आहे. कारण, भारतीय हवामान खात्यानं यंदाच्या मान्सूनसंदर्भात सुधारित अंदाज जाहीर केलाय. काय आहे हवामान खात्याचा सुधारित अंदाज? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

भारतीय हवामान खात्यानं आगामी पावसासंदर्भात नवा अंदाज जाहीर केलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्वच विभागात कमी पावसाचा अंदाज असून यंदा उष्णतेची लाट जास्त राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.

आधीच एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचं आगमन लांबणीवर पडलंय. अशातच आता भारतीय हवामान विभागानं मान्सून हंगामातील पावसाचा सुधारित अंदाज वर्तवलाय...यंदाचा मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची अधिक शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलंय. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशात सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जून महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची चिन्हे आहेत. तसेच, भारताच्या वायव्य, ईशान्य आणि दक्षिण द्विपकल्पातील काही भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानं पावसाचा अंदाज 92 टक्क्यांवरून कमी करून 90 टक्क्यांपर्यंत केलाय. विशेष म्हणजे, कमी पर्जन्यमानाचं मुख्य कारण 'एल निनो' असल्याचं सांगितलय..त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच विभागात कमी पावसाचा अंदाज आहे. आधीच अवकाळी आणि महागाईनं कंबरडं मोडलेला शेतकरी आता या नव्या संकटामुळे हवालदिल झालाय. यंदा पावसाचं प्रमाण कमी राहिल्यास राज्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. इतकंच नव्हे तर खरीप हंगामातील पेरण्या खोळंबण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानंतर राज्यातील बळीराजावर अस्मानी संकटाची टांगती तलवार आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

SCROLL FOR NEXT