Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Shreya Maskar

एलिफंटा लेणी

एलिफंटा लेणी पूर्वी 'घारापुरी' लेणी या नावाने ओळखली जायची. ज्याचा अर्थ साधारणपणे 'लेण्यांचे शहर' असा होतो.

Elephanta Caves | pinterest

जागतिक वारसा स्थळ

१९८७ मध्ये युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या एलिफंटा लेण्या म्हणजे ५ व्या ते ७ व्या शतकातील खडकात कोरलेल्या मंदिरांचा एक भव्य समूह आहे.

World Heritage Site | pinterest

एलिफंटा लेणी नाव कसं पडलं?

एलिफंटा लेणींना हे नाव एका विशाल दगडी हत्तीच्या मूर्तीवरून पडले आहे. ही मूर्ती १६ व्या शतकात पोर्तुगीजांना बेटाच्या प्रवेशद्वाराजवळ सापडली होती. या प्रचंड मूर्तीमुळे पोर्तुगीजांनी या ठिकाणाला 'इल्हा एलिफंटे' (हत्तीचे बेट) असे नाव दिले, ज्याचे कालांतराने 'एलिफंटा' असे नामकरण झाले.

Elephanta Caves | pinterest

हत्तीचा पुतळा आता कुठे आहे?

एलिफंटा लेणीतून सापडलेला दगडी हत्तीचा पुतळा आता मुंबई, जिजामाता उद्यान (भायखळा प्राणीसंग्रहालय) येथे असलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात (पूर्वीचे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय) ठेवण्यात आला आहे.

Where is the elephant statue now? | pinterest

लेणी

एलिफंटा लेणी प्रामुख्याने हिंदू देव भगवान शिव यांना समर्पित आहे. तुम्ही येथे फॅमिलीसोबत वन डे ट्रिप नक्कीच प्लान करू शकता.

cave | pinterest

कसं जायचं?

मुंबईहून एलिफंटा लेणीत जाण्यासाठी गेटवे ऑफ इंडियाकडे जा. तेथून जेट्टीवर सुमारे २००-२५० मध्ये फेरी-ट्रिप फेरीचे तिकीट खरेदी करा. अरबी समुद्र ओलांडून निसर्गरम्य बोट राइड करून जवळपास 1 तासात तुम्ही एलिफंटाला जाल.

how to go | pinterest

वास्तुकला

एलिफंटा लेणी बेसाल्ट खडकापासून कोरलेल्या प्राचीन रॉक-कट आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही शॉपिंग, फोटोशूटचा आनंद घेऊ शकता. तसेच बोटीने प्रवास करताना तुम्हाला सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळेल.

Architecture | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : हजारो वर्षांच्या इतिहासाने समृद्ध जिंजी किल्ला; 'या' नावानेही आहे प्रसिद्ध, आयुष्यात एकदा भेट द्याच

Gingee Fort | saam tv
येथे क्लिक करा...