Babasaheb patil Controversy Statement on Farmer Loan Waiver Saam TV Marathi
महाराष्ट्र

Political Controversy : महायुतीच्या मंत्र्याचं कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य, शेतकऱ्यांचा राग अनावर, पाटील नेमकं काय म्हणाले?

Babasaheb patil Controversy Statement on Farmer Loan Waiver : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये राग अनावर झाला आहे. राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Maharashtra Minister Controversy Statement on Farmer Loan Waiver : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपलेय. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीने जोर धरला आहेच. पण त्याशिवाय शेतकर्‍यांची कर्जमाफी कऱण्यात यावी, या मागणीने सत्ताधाऱ्यांना फैलावर धरले आहे. विरोधकांकडून यावरून टीका केली जात आहेच. त्याशिवाय शेतकरी वर्गामधूनही निवडणूक काळातील अश्वासनाची आठवण करून दिली जातेय. देवेंद्र फडणवीस सरकारकडून शेतकर्‍यांना मदतीचा महापूर आणला जातोय. पण हे सर्व सुरू असताना महायुतीच्या मंत्र्‍याने केलेल्या वक्तव्याने शेतकर्‍यांचा राग अनावर आला आहे. कर्ज माफीवरून सहकार मंत्र्यांनी वादग्रस्त विधान केलेय. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, असे ते म्हणाले आहेत. यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. (Babasaheb Patil controversial loan waiver statement Chopda)

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्यावरून सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे असे वक्तव्य त्यांनी कर्जमाफीवर बोलताना केलेय. आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो. निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या, अशी मागणी केल्यास निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिले जाते. लोकांनी काय मागायचे हे ठरवलं पाहिजे, असे सहकार मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी वक्तव्य केलेय. ते चोपडा येथे दीपज बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कर्जमाफीच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात, शेतकरी संघटनांमध्ये आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे होरपळलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा सध्या संवेदनशील मुद्दा आहे. त्यातच पाटलांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, याआधी माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडूनही शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. कर्जावरून वादग्रस्त वक्तव्य आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच सभागृत ऑनलाईन गेम खेळत असल्यामुळे कोकाटे यांच्यावर टीका झाली होती. आता पुन्हा अजित पवारांच्या आमदाराकडून कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wall Stain: डाग अच्छे है! मुलांनी भिंतीवर चित्र काढून भिंती खराब केल्या? 'या' सिंपल ट्रिक्सनं होतील साफ

Manache Shlok Movie Controversy: पुण्यातच मराठी चित्रपटाचा शो बंद पाडला; काय आहे कारण?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो केवायसी करा, नाहीतर... अजित पवारांची वॉर्निंग; Video

Maharashtra Live News Update: घायवळच्या जमिनी खरेदी-विक्री व्यवहाराची ४० प्रकरणं समोर

Maharashtra Politics : ठाकरेंच्या युतीत पवारांची एन्ट्री, पण महाविकास आघाडीचं काय? VIDEO

SCROLL FOR NEXT