नवी मुंबईतील नेरुळ पोलीस ठाण्याला अज्ञात व्यक्तीने खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तपासात एकूण 2 कोटी 60 लाखांची रोकड मिळाली असून ती जप्त करण्यात आलेय. ही रक्कम कोणी व कोणत्या उद्देशाने घरात ठेवली होती, याचा अधिक तपास नेरुळ पोलीस करत आहेत.
चांदिवली विधानसभेची सभा संपून मुख्यमंत्री निघत असताना एका अज्ञात इसमाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना अपशब्द वापरले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी गाडी थांबवून त्या इसमावर कारवाई करण्यास पोलिसांना आदेश दिला.
538 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जमीन मंजूर केलाय. कर्करोगाच्या उपचारासाठी देण्यात आलेला अंतरिम जामीन उच्च न्यायालयाकडून कायम करण्यात आला.कर्करोगाच्या उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी गोयल यांनी दाखल याचिका केली होती.
बीडच्या माजलगाव मतदार संघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांना धक्का मिळालाय. माजलगाव मतदारसंघात एकीकडे जयंत पाटलांची सभा सुरू असताना, दुसरीकडे मात्र पक्षाच्या तालुका अध्यक्षांसह विविध आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार रमेश आडसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा पाठिंबा दिला असल्याने आता मोहन जगताप यांच्या अडचणीत वाढ झालीय. त्यामुळं हा जगताप यांना मोठा धक्का समजला जात आहे.
ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नवीन वसाहत इमारत निर्मिती काम सुरू झाले आहे. या इमारतीचे स्वरूप बदलून तळमजला सह पाच मजली इमारत उभी राहत आहे. नवीन इमारत बांधणीचा सुमारे 28.23 कोटी रुपये पर्यंतचा प्रस्ताव आमदार कांबळे यांनी मंजूर करून घेतला आहे. यामुळे ससून सर्वोपचार रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स , कार्यालयातील कर्मचारी यांकरिता येथे अत्याधुनिक सोई सुविधा युक्त निवासस्थानाची सोय होणार आहे.
पुण्यातल्या सभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली सभा स्थळाची पाहणी. पुण्यातील सप महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मोहोळ आणि पाटील यांनी सभेत स्थळाच्या तयारीचा आढावा घेतला आहे.
विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज मतदारांच्या भेटीगाठीसाठी रिक्षातून प्रवास केला.
मतदारांच्या भेटीगाठीसोबतच प्रचाराठी बाईक रॅली, कॉर्नर सभा, सोसायटी भेट अशा विविध मार्गांनी मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या पाच वर्षातील कार्यअहवाल देण्यासोबतच भविष्यातील कामाबद्दल माहिती देत आहे. आज त्यांनी गाडीतून नव्हे तर थेट रिक्षातून प्रवास करत मतदारांच्या भेटी घेतल्या.
विधानसभा निवडणुकीसाठी पीएमपी प्रशासनाकडून 968 जादा गाड्या देण्यात येणार आहेत.याबाबतची मागणी पीएमपीला आली होती.
19 व 20 नोव्हेंबरला निवडणूक कामकाजासाठी पीएमपीच्या जादा गाड्या देण्यात येणार आहेत.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या 1880 बस गाड्या आहेत.त्यांपैकी सरासरी 1520 बस गाड्या प्रत्यक्षात मार्गांवर असतात. उर्वरित गाड्या ब्रेकडाऊन, देखभाल व दुरुस्ती,चार्जिंग यांसारख्या अन्य कारणांसाठी डेपोंमध्येच असतात.
निवडणुकीसाठी ताफ्यातील 968 बस देण्यात येणार आहेत.त्यामुळे मार्गावर प्रवाशांसाठी बस अपुर्या पडणार आहेत.मात्र त्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
'निवडणुकीच्या कामासाठी पीएमपीकडील 968 गाड्या देण्यात येणार असून आवश्यकता असेल तिथे गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील.'
शिरुर हवेली मतदारांचे आमदाराच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवी काळेंनी धक्कादायक आरोप केला आहे. आमदाराचा मुलगा ऋतुराज पवार याला अपहरणानंतर विवस्त्र करुन मारहाण करणारा मुख्य आरोपी महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवारांचा कार्यकर्ता आहे. लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंच्या सक्रिय प्रचारातही होता. त्यामुळे अशोक पवारांनी मुलाच्या मारहाणीचे भांडवल करू नये, असे काळे म्हणाले.
विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज मतदारांच्या भेटीगाठीसाठी रिक्षातून प्रवास केला.
मतदारांच्या भेटीगाठीसोबतच प्रचाराठी बाईक रॅली, कॉर्नर सभा, सोसायटी भेट अशा विविध मार्गांनी मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या पाच वर्षातील कार्यअहवाल देण्यासोबतच भविष्यातील कामाबद्दल माहिती देत आहे. आज त्यांनी गाडीतून नव्हे तर थेट रिक्षातून प्रवास करत मतदारांच्या भेटी घेतल्या.
पुण्यातील किरकटवाडी येथे एकाच रात्रीत तीन दुकाने फोडले
अज्ञात चोरट्यांनी फोडली तीन दुकाने
तिन्ही दुकाने ही किराणा मालाचे असल्याची माहिती
घटनेचा सी सी टिव्ही आला समोर
काही दिवसांपूर्वी कोल्हेवाडी येथे चार दुकाने फोडण्यात आली होती
लाखो रूपयांचे सोने खडकवासला, किरकटवाडी येथून चोरी झालेले असून त्याचा अद्याप हवेली पोलीसांना तपास लागलेला नाही
व्यावसायिक, नागरिक सर्वच चोरांच्या दहशतीखाली असल्याच्या चर्चा
गेली अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी राज्याच नेतृत्व करुन सिध्द करुन दाखवले तर अडीच वर्षे काहीजण घरामध्ये बसले गेली अडीच वर्षात सातत्याने जनतेमध्ये 17 ते 18 तास जनतेमध्ये खर्च करणारा एक मुख्यमंत्री आहे.त्यामुळे लोकांनी ही तफावत ओळखली आहे.हिंदुत्वाता मुद्दा घेवुन शिंदेंनी पक्ष वाचवण्याच काम केल व राज्याला पुढे नेहण्याचे काम केले त्यामुळे लोक विकासाला मत देतील तसेच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अस मला वाटत याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील.पण आवडेल की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अस वक्तव्य खा.श्रीरंग बारणे यांनी धाराशिव च्या कळंब येथे केले,महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचाराचा कळंब येथे बारणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
नांदेडच्या भोकर येथे भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांची सभा.
भोकर विधानसभेच्या भाजप उमेदवार श्रीजया चव्हाण व नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ सभा.
खासदार अशोक चव्हाण यांच्यासह आमदार बाबूसिंग राठोड महाराज, सचिन साठे यांची राहणार उपस्थिती
थोड्याच वेळात होणार सभेला सुरुवात
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का
ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी उपनेते पदाचा दिला राजीनामा
राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल
माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे लांडे प्रचारात सक्रिय..
माजी मंत्री विजय शिवतारे पुरंदर हवेली मतदार संघातून निवडणुक लढवत आहेत.
काल ममता शिवतारे यांनी पुरंदर हवेलीचा पुणे शहराला लागून असलेल्या भागात प्रचार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पुण्यात सभा
सभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत बदल
ही सभा पुण्याच्या टिळक रस्त्यावरील स. प.महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
सोलापूरमध्ये भगीरथ भालके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची धावती भेट
पुढील दौरा असल्याने उद्धव ठाकरे सोलापुरातून पुढे दौऱ्यासाठी भालेराव आला
महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे, चेतन नरोटे आणि भगीरथ भालके यांनी पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरे यांचा केला सत्कार
अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातील वलगाव आणि नया अकोला येथील महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचाराचे अज्ञातांनी फाडले बॅनर
विरोधकांनी बॅनर फाडल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप
वालगाव पोलिस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्ते दाखल
बॅनर फाडणाऱ्या अज्ञाताविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पोलिसात तक्रार दाखल
पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे.
याच सभेची जय्यत तयारी भाजपकडून करण्यात येत आहे.
कसबा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत दासणे यांनी 70 हजार निमंत्रण मुलीच्या शुभेच्छा नागरिकांना व पदाधिकाऱ्यांना पाठवले आहेत.
मुलुंडचे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
मिहीर कोटेचा यांनी प्रचारादरम्यान काही अज्ञात इसम माझी भेट घेण्याचा माझ्या जीवाला बरे वाईट करण्याचा त्यांचा डाव असल्याचं सांगितलं होतं
यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहिलं होतं
त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत
पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या होम वोटिंग आजपासून सुरू होत आहे .
शिवाजीनगर पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघात असणाऱ्या डेक्कन भागात होम वोटिंग होणार
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी होम वोटिंग
सुविधा आज पासून सुरू होत आहे
85 वयापेक्षा जास्त असलेले नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती
घरबसल्या 12 डी फॉर्म भरून पोस्टर बॅलेटने मतदान करणार आहेत
सकाळी साडेआठ पासून ते पाच वाजेपर्यंत होम वोटिंग प्रक्रिया सुरू असणारे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थोड्याच वेळात रोड शोला सुरुवात होणार आहे..
दक्षिण पश्चिम मतदारसंघात आज दुसऱ्यांदा हा रोडशो होते आहे मनीष नगर परिसरातून हा रोड शो सुरु होत पुढे त्रिशरण चौकापर्यंत याचा समापन होणार आहे..
निवडणूक काळात व्यस्तता पाहता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा माध्यम म्हणून रोड शोचा पर्याय महत्त्वाचा ठरत असतो
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.