Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२५, राज्यात पावसाच्या हलक्या सरी, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी; देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Kolhapur: कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ आपचं धूळफेक आंदोलन

कोल्हापूर शहरात खराब रस्त्यांमुळे धुळीचं साम्राज्य पसरलं आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर अनोखं लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर पाटीनं खडी आणि धूळ फेकून प्रशासनाचा निषेध नोदंविलांय. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान महापालिका प्रशासनाने कोल्हापूर शहराला दर्जेदार रस्ते द्यावेत आणि नागरिकांची धूळीपासून सुटका करावी अन्यथा महापालिका अधिकाऱ्यांच्या तोडांवर धूळ फेकण्याचा इशारा आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलायं.

Nilesh Ghayawal: निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग

निलेश घायवळ प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे

निलेश घायवळ यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करणार

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जरी केले आदेश

२०२१ मध्ये सुद्धा घायवळ वर दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे होता

घायवळ वर ३० दिवसांच्या आत ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

कोथरूड मध्ये झालेला गोळीबार, वाहनांचा खोटा नंबर, घरात मिळून आलेलं शस्त्र, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे घायवळ वर दाखल करण्यात आले आहेत

Kolhapur: व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी कोल्हापूर जिल्हाधिकारी पोलीस प्रमुखांना चौकशी करण्याच्या सूचना

व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि कोल्हापूर पोलीस प्रमुखांना चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत

व्हिडिओ नेमका कधीचा आहे कुठला आहे या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

Raigad: रायगडमध्ये बंजारा समाज उतरला रस्त्यावर ,ST प्रवर्गात सामील करून घेण्याची केली मागणी

सध्या राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा सुरू असतानाच रायगड मध्ये आदिवासी समाजानंतर आता बंजारा समाज देखील मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलाय. आज अलिबाग मधील जिल्हाधिकारी कार्यालयावर या समाजाने मोर्चा काढत आम्हाला एसटी प्रवर्गात सामील करून घ्या अशी मागणी केली. सरकारने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आणखीन मोठ्या संख्येने राज्यभरात रस्त्यावर उतरू असा इशारा या समाज बांधवांनी यावेळी दिला.

Thane: ठाणे जिल्ह्यात 17 ड्रग्ज तस्करांवर मोक्का

ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांनी तब्बल 17 ड्रग्स तस्करांवर मोक्का अंतर्गत मोठी कारवाई केली आहे.

विशाखापट्टणम ते कल्याण असा पसरलेला अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजा, वाहने, पिस्तूल, वॉकी-टॉकीसह तब्बल 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या टोळीविरोधात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे तसेच तेलंगणा राज्यातही अनेक गुन्हे नोंद आहेत.

Maratha Aarakshan: मराठा आंदोलक अ‍ॅड. योगेश केदार यांचा लक्ष्मण हाकेवर जोरदार प्रहार

मराठा आरक्षण चळवळीतून चर्चेत आलेले अ‍ॅड. योगेश केदार यांनी आज लक्ष्मण हाके यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “भुजबळांनी लाथ घालून हाकलून लावलेला श्वान असलेला लक्ष्मण हाके, राधाकृष्ण विखे पाटील यांना महामूर्ख म्हणतो, ही त्याची लायकीच नाही,” असे वक्तव्य अ‍ॅड. केदार यांनी केले.

या वक्तव्यामुळे मराठा आंदोलनाच्या वर्तुळात नवा वाद पेटला आहे. केदार यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांमध्ये तीव्र चर्चांना उधाण आले आहे. हाके यांच्या प्रतिक्रियेची सर्वत्र उत्सुकता लागली आहे.

Pune: धावत्या पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बसने घेतला पेट

आकुर्डी वरून निगडी च्या दिशेने जात असलेली लेक्ट्रा इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बस ला काही वेळापूर्वी अचानक भीषण आग लागली. त्यावेळी पीएमपीएमएल बसला आग लागली त्यावेळी धावत्या पी एम पी एम एल बस मध्ये जवळपास 35 ते 50 प्रवासी हे प्रवास करत होते. बस मध्ये अचानक आग लागल्याने प्रवासांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली.

 Mumbai: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला पाहण्यासाठी शिवाजी पार्कात चाहत्यांची गर्दी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि क्रिकेटर अभिषेक नायर यांनी मुंबईच्या दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला यावेळी क्रिकेट चाहत्यांकडून मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा जोरदार घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या रोहित शर्मा याच्यासोबत फोटो घेण्यासाठी चाहत्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाल

Mumbai: पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला बेवारस मृतदेह

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी मार्ट सर्कल हिरानंदानी गार्डन येथे एका अपघातात अनोळखी इसम वय ४५ वर्षे याचा रोड अपघातात मृत्यू झाला आहे. सदर मयत अनोळखी इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत असताना त्यांचे काही ओळखीच्या लोकांकडून त्यांचे नाव राजू असल्याची माहिती मिळून आली आहे. मयताचे नातेवाईक अजून पर्यंत मिळून आले नसल्यामुळे त्याचा मृतदेह राजावाडी शवविच्छेदन केंद्र घाटकोपर येथे राखून ठेवण्यात आला असून मयताच्या नातेवकाचा शोध पोलीस घेत आहे.

Nandurbar: नंदुरबार दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला 'तीन'ची सुट्टी

नंदुरबार दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला 'तीन'ची सुट्टी...

विद्यार्थी वाऱ्यावर सोडून शिक्षक दुपारीच फरार....

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात जिल्हा परिषदेतील शिक्षकांचा काम चुकारपणा आला समोर.....

दुर्गम भागात दुपारी तीनला होते शाळा बंद....

जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावून शिक्षक तीन वाजताच फरार...

धडगाव तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या नर्मदा काठाजवळ असलेल्या माळ गावातील कारभारी पाड्यावरची संताप जनक घटना....

शिक्षक दररोज दुपारी तीन वाजता शाळा बंद करून निघून जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार...

शाळेवर असलेल्या तीन शिक्षकांपैकी एक किंवा दोनच शिक्षक आडीपाडीने शाळात येत असल्याचा प्रकार....

Mumbai: छठपूजेला सार्वजनिक परवानगी देऊ नये, मराठी एकीकरण समितीची मागणी

आगामी छठपूजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देऊ नये, अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी प्रशासनाकडे केली आहे. समितीचे म्हणणे आहे की, छठपूजा ही वाहत्या पाण्यात केली जाणारी धार्मिक प्रथा असली तरी समुद्र किनारे, तलाव, चौपाट्या यांसारख्या स्थिर पाणवठ्यांवर पूजा केल्याने पर्यावरण आणि स्वच्छतेवर विपरित परिणाम होतो.

कोविड काळात नागरिकांनी घरगुती स्तरावर टबमध्ये पाणी भरून पूजा केल्या होत्या, त्याचप्रमाणे यंदाही घरीच पूजा करण्याचे आवाहन प्रशासनाने करावे, असे समितीचे म्हणणे आहे. जसे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून पर्यावरण रक्षणाचे पाऊल उचलण्यात आले, तसेच छठपूजेसाठीही बंदी घालून पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी छठपूजा केल्याने प्रदूषण, अस्वच्छता आणि प्रशासकीय यंत्रणेवरचा अतिरिक्त ताण वाढतो, त्यामुळे मराठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सार्वजनिक छठपूजेला परवानगी देऊ नये, अशी भूमिका मराठी एकीकरण समितीने स्पष्ट केली आहे.

Washim: वाशिम जिल्ह्यातील ३ तालुके वगळल्या च्या निषेधार्थ स्वाभिमानी संघटनेकडून आंदोलन

वाशिम -

वाशिम जिल्ह्यातील ३ तालुके वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानाचे युवक प्रदेशचे अध्यक्ष चढले टॉवरवर

रिसोड,मालेगाव आणि मंगरूळपीर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत नाव समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आंदोलन...

जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरातील पवनचक्कीच्या टावर वर चढले...

दामू इंगोले असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्षचे नाव आहे...

Pune: अतिवृष्टीची मोजणी करण्यासाठी स्कायमेट कुठून शेतकऱ्यांची दिशाभूल

पुणे -

अतिवृष्टीची मोजणी करण्यासाठी स्कायमेट कुठून शेतकऱ्यांची दिशाभूल

ज्या दिवशी पाऊस झाला त्या दिवशी पाऊस झाला नसल्याचं स्कायमेटच्या रिपोर्टमध्ये

ज्या दिवशी पाऊस नाही झाला त्या दिवशी अतिवृष्टी झाल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट

दहा हजार शेतकऱ्यांना स्कायमेटचा फटका

आमदार अभिजीत पाटील यांनी घेतली कृषीमंत्र्यांची भेट

Beed: बीडमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये 17 ऑक्टोबरला ओबीसी महाएल्गार मेळावा

बीड -

बीडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये होणार ओबीसी महाएल्गार मेळावा

मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनाही देणार निमंत्रण

दोन सप्टेंबर चा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठीच होणार बीडमध्ये मेळावा

तुमच्या व्यासपीठावर मराठा मंत्री येतात.. तुम्ही त्यांचा राजीनामा मागितला का?.. सभा उधळाची भाषा कोणी करू नये.. एडवोकेट सुभाष राऊत यांचा इशारा

Beed: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

बीड -

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

कायदा विषयक सल्लागार परमेश्वर गीतेंनी केला कारखाना विक्रीचा गंभीर आरोप

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केला होता हा कारखाना

Ahilyanagar: आरक्षणाच्या मागणीसाठी अहिल्यानगरमध्ये वंजारी समाजाचे जलसमाधी आंदोलन

अहिल्यानगर -

आरक्षणाच्या मागणीसाठी वडगाव थाटे येथे जलसमाधी आंदोलन

वंजारी समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची होत आहे मागणी

Nashik: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीला सुरुवात

नाशिक -

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीला सुरुवात

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र

- उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी, मंत्री आणि महत्त्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित

- प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे यांच्यासह इतर काही मंत्री राहणार बैठकीला उपस्थित

सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामुळे आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 15 दिवसांमध्येच बार्शी तालुक्यातील कारी येथे आणखी एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. उमेश रमेश विधाते (वय ३६, रा. कारी, ता. बार्शी) यांनी विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामुळे सोबतच कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक वर्षाचे मूल आहे. पुढील तपास पांगरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

 अतिवृष्टीच्या मदतीच्या शासन निर्णयात वाशिम जिल्ह्यातील तीन तालुके वगळले

राज्य सरकारने विशेष मदतीचे पॅकेज घोषित केलं, त्या यादीत वाशिम जिल्ह्यातील रिसोड,मालेगाव आणि मंगरूळपीर तालुक्याला वगळण्यात आलं याच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शासन निर्णयाची प्रत जाळून भाजपचा निषेध व्यक्त केला.

लातूर अंबाजोगाई महामार्गावर संभाजी सेनेचा रस्ता रोको.. शेतकऱ्याच्या प्रश्नावर संभाजी सेना आक्रमक..

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करा, सरसकट 50 हजाराची मदत जाहीर करा. यासह इतर मागण्या घेऊन लातूर अंबाजोगाई महामार्गावरच्या महापूर पाटी येथे संभाजी सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. आज लातूर जिल्ह्यातल्या दहा तालुक्यात संभाजी सेनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला आहे..

अल्पवयीन तरुणी किडनॅप ! मोताळ्यात नाकाबंदी

मलकापूरहून एका सोळा वर्षीय युवतीचे अपहरण झाले आणि तिला घेऊन जाणारी स्विफ्ट डिझायर कार मोताळ्यात पोलिसांनी रोखली. दरम्यान पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पुढे सुसाट निघाली. पण गाडीचे टायर फुटले आणि सदर गाडी बाजूच्या एका शेतामध्ये जाऊन अपघातग्रस्त झाली. विशेष म्हणजे या गाडीच्या मागे मुलीला वाचविण्यासाठी दुसरी गाडी पिच्छा करत होती. मुलीला ताब्यात घेतले गेले. अपहरण करणारे तीन जण पोलिसांनी पकडले. पकडलेल्यांपैकी दोन जण अल्पवयीन असल्याचे समजते. या सर्व घटनेदरम्यान मुलगी बेशुद्ध पडली होती. तिला मोताळ्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Maharashtra Live News Update: दिल्ली हायकोर्टाकडून शाहरुख खान, गौरी खान आणि नेटफ्लिक्सला समन्स

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेनमेंट, शाहरुख खान, गौरी खान आणि नेटफ्लिक्स यांना समन्स जारी केले आहेत. न्यायालयाने दुरुस्त केलेली याचिका नोंदवून घेण्यास परवानगी दिली आहे. ही अर्ज मंजूर करून प्रकरण निकाली काढण्यात आले असून, पुढील सुनावणीची तारीख ३० ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; एक लाखाची रोकड लंपास

जळगाव : जिल्ह्यात आरोपींवर अंकुश बसवण्यासाठी पोलीस प्रशासन विविध कारवाया करत असतानाही, मुक्ताईनगर येथील 'रक्षा ऑटो फ्युएल्स' या केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री सुमारास दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एक लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. या प्रकरणी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा बाजार भाव घसरण

गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले त्यात आता साठवणूक केलेल्या उन्हाळा कांद्याच्या दरात ऐन दिवाळीच्या तोंडावर घसरण होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव दया, विक्री झालेला व विक्री होणाऱ्या कांद्याला पंधराशे रुपये अनुदान द्या तसेच नाफेड एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा बाजारात आणू नये आणि भविष्यात कांद्याची खरेदी करू नये या मागण्यांसाठी आज शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदविकाऱ्यांनी थेट लासलगाव बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे नाशिक-छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.

Jalgaon News : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला आहे. जळगावमधील महामार्ग क्रमांक सहावर रक्षा खडसे यांचा पेट्रोल पंप आहे. दरोडेखोरांनी बंदुकी धाक दाखवत लाखो रुपये आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे साहित्य लुटून नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पाच दरोडेखोर हे असल्याची माहिती संशयितांना सिनेस्टाईल पाठलाग करत तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरोडेखोर हे मोटरसायकल वर येऊन हा दरोडा टाकला आहे.

NAVI MUMBAI : भाजीपाला किरकोळ मार्केट ला १५० ते २२५ रूपये किलोवर

राज्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका सर्वच जिल्ह्यांना बसला आहे. यामुळे याचा परिणाम थेट भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. आलेले भाजीपाला पिक पावसात खराब झाल्याने उत्पन्न घटले आहे. यामुळे वाशीतील एपीएमसी मार्केट मध्ये होणारा भाजीपाला पुरवठा निम्यारव आला आहे. १५ ते १६ हजार किलो येणारा भाजीपाला आता ६ ते ७ हजार किलोवर आला आहे. आवक घटल्याने भाजीपाला दर गगनाला भिडले आहेत. नवीन भाजीपाला पिक येण्यास दीड ते दोन महिने लागणार असल्याने भाजीपाला दर चढेच राहण्याची शक्यता आहे. परराज्यातून येणारी आवक सुध्दा कमी आहे. किरकोळ मार्केट ला १५० ते २२५ रूपये किलोवर भाजीपाला विकला जात आहे.

मेगा ब्लॉकमुळे 'मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' रद्द

मध्य रेल्वेने कर्जत रेल्वे स्थानकावर 12 ऑक्टोबरला तब्बल 30 तासांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे . यामुळे सोलापूर येथून दक्षिण भारताच्या दिशेने धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडणार आहे.11 ते 12 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या ब्लॉकमुळे 12 ऑक्टोबर रोजी मुंबई–सोलापूर–मुंबई वंदे भारत एक्प्रेस गाडी रद्द करण्यात आली. सोलापूर–मुंबई सिद्धेश्वर एक्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार आहे. त्यामुळे सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि सोलापुरात परतणाऱ्या प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागणार आहे.

 कणकवलीत दोन तास पडलेल्या पावसाने भातशेतीचे नुकसान

परतीच्या पावसाने कणकवली तालुक्यातील काही भागात धुमाकूळ घातला. गुरुवारी रात्री उशिरा तब्बल दीड ते दोन तास ढगांचा गडगडासह पाऊस कोसळला. या पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भात कापणी करून वाळत ठरलेल्या ठीकाणी पाणी भरल्याने भाताचे नुकसान झाले. पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर भात पिकाच्या कापणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पण अचानक आलेल्या पावसाने कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. सध्या भात कापणीला वेग आला आहे मात्र पावसाच्या सावटामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी चुकीचे वक्तव्य करून भूल थापा मारू नये... 2 सप्टेंबर च्या जीआर चा विषय न्यायप्रविष्ठ असला तरी त्या विरोधातील याचिका आमच्याच (ओबीसी कार्यकर्त्यांच्या) आहेत, जीआर रद्द झाला तर त्या याचिका ही मागे घेतल्या जातील, त्यामुळे जीआर चा विषय न्यायप्रविष्ठ आहे, असं विखे पाटील यांनी बोलून जीआर मध्ये बदल करण्यास नाकारणे योग्य नाही.
विजय वडेट्टीवार

PALGHAR : - बोईसर च्या टाटा हाऊसिंग सोसायटीत सिलेंडरचा स्फोट

बोईसरच्या टाटा हाऊसिंग सोसायटीत सिलेंडरचा स्फोट. टाटा हाऊसिंग सोसायटीमधील एस एल २२ नंबरच्या इमारतीतील फ्लॅटमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

पुण्यात पीएमपीएमएलची नवी संकल्पना बसमध्येच फिरते वाचनालय

शिक्षण आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पीएमपीएमएलने एक आगळीवेगळी संकल्पना राबवली आहे. जुन्या स्क्रॅप बसचे पुनर्वापर करून त्यातून फिरते वाचनालय तयार करण्यात आले आहे.

या बसमध्ये सुमारे 250 पुस्तके असून, मराठी साहित्य, आत्मचरित्र, इतिहास, प्रेरणादायी आणि राजकीय विषयांवरील ग्रंथांचा समावेश आहे. वाचकांसाठी हे वाचनालय पूर्णतः मोफत खुले ठेवण्यात आले आहे.हा उपक्रम पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून साकारला असून, वाचाल तर वाचाल या संदेशावर आधारित आहे. सध्या ही बस एफसी कॉलेज परिसरात असून, पुढे ती शहरातील विविध भागांत फिरणार आहे.टाकाऊपासून टिकाऊ या विचारातून साकारलेला हा उपक्रम वाचनाबरोबरच पर्यावरणपूरक आणि प्रेरणादायी ठरत आहे.

तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी केले युवा प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन

शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा खा. सुनिल तटकरे यांना डिवचले आहे. रोहा येथे महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार दळवी यांनी तटकरे कुटुंबाला टिकेचे लक्ष केले. कोणावर अन्याय करू नका, ताईचा, भाईचा, साहेबांचा फोन येईल अस चालणार नाही. अस सांगताना रोह्यातील दबावाचा राजकारणाचा दळवी यांनी उल्लेख केला. मुरुडप्रमाणे रोहा मी दत्तक घेतला अस त्याचे दळवी म्हणाले. यांना कायमच काही दिल नाहीये, यांची खुर्ची काढण्याची हिचती वेळ आहे. पुढचे 90 दिवस महत्वाचे असल्याचे सांगताना तटकरे यांच्यावर दळवी यांनी निवडणुकीत फसवणुक केल्याचे आरोप पुन्हा एकदा केले आहेत.

बुलढाणा : जुन्या वादातून 21 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून

मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर येथे जुन्या क्षुल्लक वादातून झालेल्या दोन गटाच्या हाणामारीत चाकूहल्ला झाल्याने एका 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय .. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केलीय .. मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा येथील सतीश गजानन झाल्टे आणि अविनाश जितेंद्र झाल्टे या दोघांचा काही दिवसांपूर्वी मलकापूर येथील काही युवकांशी फाट्यावर वाद झाला होता.. हे दोघे दर्शनासाठी धोपेश्वर मंदिरात आले असता मलकापूर येथील युवक त्या ठिकाणी पोहोचले. आणि जुन्या वादातून पुन्हा दोन्ही गटात हाणामारी झाली, दुसऱ्या गटाने पिंप्राळा येथील दोघांवर चाकूचा हल्ला केला.. या चाकू हल्ल्यात दोघे ही जमिनीवर पडले असता यातील सतीश झाल्टे या युवकाचा जागीच मृत्य झाला आहे. . दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत . घटनेनंतर शेजारील ग्रामस्थानी मलकापूर येथील आरोपी युवकांना चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलेय ..

महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या रेस्पिफ्रेश कफ सिरपचा बीडमध्ये आढळला साठा

एक धक्कादायक बातमी बीड मधून समोर येते. महाराष्ट्र शासनाने विक्रीस बंदी घातलेल्या रेस्पिफ्रेश टीआर कफ सिरपचा साठा जिल्ह्यात सापडला आहे. लहान मुलांना खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या या सिरपमुळे मध्यप्रदेशात 20 हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याने देशभरात संताप व्यक्त झाला होता. त्यानंतर शासनाने या सिरपवर तात्काळ बंदी आणली होती. मात्र तरीही बीडमध्ये या बंदी घातलेल्या सिरपच्या 500 बाटल्या आढळून आल्याने औषध प्रशासनात खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका वितरकाकडून बीडमधील दोन एजन्सींना या सिरपचा पुरवठा झाला असून, त्या एजन्सीकडून बीड शहर, आष्टी, परळी आणि गेवराई येथील मेडिकलपर्यंत तो पोहोचल्याचं समोर आलं आहे. औषध प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला असून सर्व साठा मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अहमदाबाद येथील स्मार्टवे वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तयार केलेल्या या सिरपमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jalgaon : वरणगाव येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून संजय गोपाळ चंडेले असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. दरम्यान या गुन्हेगाराकडून दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले असून याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

दोन पायावर येशील आणि स्ट्रेचरवर जाशील! वारीस पठाण यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल

एमआयएमचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची आज अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) मुकुंदनगरच्या सी.आय.व्ही ग्राउंडवर ओवैसींची जाहीर सभा झाली. या सभेत एमआयएमचे नेते वारीस पठाण (Waris Pathan) यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर जोरदार हल्ला केल्याचं पाहायला मिळालं. येशील दोन पायावर आणि जाशील स्ट्रेचरवर असे म्हणत वारीस पठाण यांनी मंत्री नितेश राणेंवर हल्लाबोल केला.

घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल

प्रधानमंत्री आवास योजना व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी मोठे बदल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशानंतर सुधारित निर्णय जारी

घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

गरिबांच्या घरकुलाला वाळू मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी

लिलाव धारकांचा आर्थिक बोजा आता सरकार उचलणार

राज्यातील वाळू व्यवस्थापन व घरकुल योजनांना गती देण्यासाठी बदल

तीन वर्षांतून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार

खाणकाम आराखडा, पर्यावरण परवानगी आणि इतर आवश्यक परवानग्या दरवर्षी घ्याव्या लागणार

मराठी गुजरातीनंतर आता भाजपचा उत्तर भारतीय मतांवर डोळा

छटपूजेच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी बोलावली आढावा बैठक

मुंबई पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त आणि पोलीसआयुक्तांशी करणार चर्चा 

छट पूजा उत्सव समितीचे प्रतिनिधीही राहणार उपस्थित 

आज दुपारी एक वाजता बोलावली मुंबई महानगरपालिकेत बैठक

छट पूजेच्या चार दिवसाच्या कालावधीत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बोलावली आढावा बैठक

राज्य मार्गावरील खड्ड्यामुळे महिलेचा बळी

पालघर - राज्य मार्गावरील खड्ड्यामुळे महिलेचा बळी . पालघर मनोर नाशिक मार्गावरील घटना. मनोर जवळ असलेल्या खड्ड्यात बाईकचा अपघात. बाईकवर बसलेल्या महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू. पालघर मधील नावजे येथील 47 वर्षीय अनिता अनिल पाटील या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू . जिल्ह्यातील राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांची दुरावस्था . सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मात्र दुर्लक्ष .

महाडमध्ये पोलिस हवालदार ACB च्या जाळ्यात

रायगडच्या महाडमध्ये पोलिस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जाळ्यात लाच स्विकारताना रंगे हात पकडला गेला आहे. विषाल वाघाटे असे या आरोपीत पोलिस हवालदाराचे नाव आहे. पोस्को कायद्या अंर्तगत कारवाई न करणे आणि योग्य ती मदत करण्यासाठी आरोपी वाघाटे याने पाच लाखाची लाच मागीतली होती. पैकी तीन लाख रूपये स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढील कारवाई करीत आहे.

दोन्ही डोळ्यांची दूरदृष्टी नसलेल्या लहान बहिणीला भावाची दारू पिऊन मारहाण

हिंगोलीत दोन्ही डोळ्यांनी दिसत नसलेल्या अपंग बहिणीला भावाने दारू पिऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे, हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील अंजनवडा गावात हा गंभीर प्रकार पुढे आला आहे, मारहाण करणाऱ्या भावाचे नाव सुरेश काचगुंडे असे आहे तर मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बहिणीचे नाव उषा काचगुंडे आहे दरम्यान लोखंडी रॉड काठी आणि लाथा व बुक्क्यांनी बहिणीला दोन तास मारहाण करताना गावातील कुणीही सोडवायला आले नाही तर जीवाच्या आकांताने जखमी अवस्थेत घरच्या बाहेर पडलेल्या बहिणीने पिण्यासाठी पाणी मागितले तर पाणी देणाऱ्याला देखील या भावाने धमकावले आहे अखेर गावातील सरपंचांनी या राक्षस भावाच्या तावडीतून बहिणीची सुटका करत तिला हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे सध्या औंढा पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करत असून तातडीने मारहाण करणाऱ्या माझ्या भावाला अटक करा अशी विनंती दूरदृष्टी नसलेली बहीण पोलिसांना करत आहे.

जळगाव महापालिका अंतिम प्रभागरचना जाहीर ९० टक्के हरकती फेटाळल्या

जळगाव सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिका प्रशासनाने ३ सप्टेंबरला १९ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली होती. या आराखड्यावर नागरिक, माजी नगरसेवक व सामाजिक संस्थांकडून एकूण ७० हरकती व सूचना प्राप्त झाल्या. यावर महापालिका प्रशासनाने सुनावणी घेऊन विभागीय आयुक्त तसेच निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवला होता. निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागरचना जाहीर केली असून, दोन हरकती आणि चार सूचना मान्य करून ६४ हरकती नामंजूर केल्याने ९० हरकती प्रशासनाने फेटाळून लावल्या आहे. त्यानुसार अंतिम प्रभागरचना अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रभागातील आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

कोल्हापूर महापालिकेकडून अंतिम प्रभाग रचना आज जाहीर होणार

महापालिका निवडणुकीसाठीच्या अंतिम प्रभाग रचनेची प्रसिद्धी आज होणार आहे. गेल्या महिन्यापासून सुरू असलेली प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी राज्य निवडणूक आयोगासमोर अंतिम प्रभाग रचनेचे सादरीकरण केले. हरकतींमधून आलेल्या शिफारशींचा विचार करून त्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी दिली आहे. ती आज महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील स्थायी समितीच्या सभागृहात तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. त्यामध्ये नेमक्या केलेल्या हरकतींचे काय झाले की नाही, हे समजणार आहे. त्याबाबत फारशी उत्सुकता नाही; पण आता इच्छुकांचे आरक्षण सोडत आणि मतदार यादी कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी विशेष ग्रामसभा घ्यावी

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते,बंधारे,पुल पाणीपुरवठा योजनांच्या विहीरी तसेच इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या नुकसानीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परीणाम झाला आहे.दरम्यान या पाश्र्वभूमीवर सर्व ग्रामपंचायतींनी मंगळवारी विशेष ग्रामसभा आयोजित करुन आपल्या कार्यक्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा आढावा घ्यावा अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.तसेच ग्रामसभेत नुकसानीचे केलेल्या पंचनाम्याचे चावडीवर वाचन करण्याची मागणी केली आहे.

धावत्या दुचाकीने घेतला पेट. नांदेडच्या लोहा शहरातील घटना.

धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. नांदेडच्या लोहा शहरातील मुख्य रस्त्यावर ही घटना घडली. दुचाकीने पेट घेतल्याने लोहा शहरातील रस्त्यावर एकच धावपळ उडाली. दुचाकीला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. परंतु या आगीच्या घटनेत दुचाकी जळून खाक झाली.

भिडे पूल या वेळेत राहाणार वाहतुकीसाठी खुला

भिडे पुलावरील वाहतूक सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत पूल वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार असून,रात्री दहानंतर मेट्रो पुलाच्या कामानिमित्त वाहतूक बंद राहील.

दिवाळीपूर्वी वाढणाऱ्या गर्दीचा विचार करून वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी होत असताना,भिडे पूल बंद असल्यामुळे लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, तसेच छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.

मागासवर्गीय समाजाचा निधी लाडक्या बहिणीला वळवण्याचा विरोधात निदर्शने

सामाजिक न्याय विभागाचा तब्बल साडेचारशे कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने "लाडक्या बहिणी" योजनेसाठी वळवल्याचा निषेध राष्ट्रीय चर्मकार महासंघाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करीत व्यक्त करीत निवेदन देण्यात आले. मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी असलेला निधी इतर योजनांकडे वळवणे हे अन्यायकारक असून सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Junnar-जुन्नर बाजार समिती वादात शाब्दिक हाणामारी! आमदार सोनवणेंनी बाप काढत दिलं चॅलेंज — सभापती संजय काळेंनी स्विकारलं!

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमिनीच्या खरेदीत तब्बल 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भव्य मोर्चा काढत आमदार शरद सोनवणे यांनी सभापती संजय काळेंवर करत बाप काढल्याने जुन्नर चे राजकारण तापमान चांगलंच तापलं

जमिनीच्या खरेदीतील कथित भ्रष्टाचारावरून आमदार सोनवणे यांनी सभापती संजय काळेंचा “बाप काढत” शेतकरी सभा घेऊन दाखवा, शेतकरी तुमचे तीन तेरा वाजवतील, असं चॅलेंज दिलं. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय काळेंनी “माझे वडील शिवाजी आणि आई जिजाबाई आहेत, आमच्या संस्कृतीत अशा भाषेला जागा नाही” असं सांगत अमोल कोल्हे आणि अतुल बेनकेंच्या उपस्थित जाहिर सभेतुन आमदार सोनवणेंच्या भाषाशैलीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत त्यांचं चॅलेंज स्विकारल्याचं जाहीर केलं.

अकोल्यात कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्याचा 'विवस्त्र व्हिडिओ' वायरल.

आंतरशालेय कुस्ती स्पर्धानिमित्त आलेल्या कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्याचा वजन करतानांचा विवस्त्र Video व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय.. सोशल मीडियावर video वायरल केल्याप्रकरणी अकोल्यातील कुस्ती प्रशिक्षक कुणाल माधवे' विरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणाने आंतरशालेय कुस्ती स्पर्धेला गालबोट लागलंय..

'कंत्राटदाराची निष्काळजी बकऱ्यांच्या जीवावर बेतली. रस्ता आणि खाण कंत्राटदाराने रस्त्याच्याकडेला टाकून दिलेल्या डांबरात 8 ते 9 बकऱ्या फसून मेल्यात.

अकोला जिल्ह्यातील निपाना गावात एक अजब प्रकार घडलाय. काही महिन्यांपूर्वी वणीरंभापूर ते कानशिवणी रस्त्याचे काम झालेय. या रस्त्याच्या बांधकामाचं कंत्राट 'ईगल इन्फ्रा कंपनी'कडे होतंय. रस्त्यावर टाकण्यासाठी डांबर आणि खडी टाकण्यासाठी कंत्राटदाराने एक शेत भाड्याने घेतलं होतंय. काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने शेतात उरलेल्या डांबराच्या टाक्या आणि खडी तशीच ठेवलीय. गेल्या दोन दिवसांत डांबर वितळून शेतात पसरलंय. यावेळी शेतात चरायला गेलेल्या 13 बकऱ्या या डांबरात फसल्यात. यातील 9 बकऱ्या या डांबरात फसून मेल्यायेत. बकऱ्यांच्या मालकांनी कंत्राटदाराकडे नुकसान भरपाईची मागणी केलीय. नुकसान झालेले सर्व पशुपालक बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कंत्राटदाराविरोधात तक्रार देण्याच्या तयारीत आहेय..

मोरीवलीतील १२ प्रदूषणकारी कंपन्यांवर एमपीसीबी करणार कारवाई

अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतून मागील काही दिवसांपासून दररोज गॅस सोडला जात असल्याचं समोर आलं होतं. याची दखल घेत एमपीसीबी अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री मोरीवली एमआयडीसीतील ३० रासायनिक कंपन्यांना अचानक भेटी देत पाहणी केली.

या पाहणीत ३० पैकी तब्बल १२ रासायनिक कंपन्या नियमांचं पालन करत नसून प्रदूषणाला कारणीभूत ठरत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. या कंपन्यांवर आता एमपीसीबीकडून कारवाई केली जाणार आहे. तर या पाहणी दरम्यान १७ नंबरच्या कॅटेगरीत येणाऱ्या सेंटॉर फार्मा आणि ब्रिलियंट पॉलिमर या दोन कंपन्यांमध्ये एमपीएबीने प्रदूषण मोजणाऱ्या व्हॅन लावल्या होत्या. या मोजणीची आकडेवारीही समोर आली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या आवारात हवेतील काही घटक हे प्रमाणापेक्षा जास्त आढळले असून हवेची गुणवत्ताही चांगली नसल्याचं समोर आलं आहे. या पाहणीत दोषी आढळलेल्या प्रदूषणकारी कंपन्यांवर एमपीसीबीने आता थातुरमातुर कारवाई न करता कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ मध्ये भाजप अजितदादा गटाची युती होणार?

अंबरनाथमध्ये महायुतीचे दोन घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या सून अश्विनी सचिन पाटील या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीसांचं निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य; महायुतीच्या निर्णयावर स्पष्ट भूमिका, VIDEO

Madhavi Nimkar: टिव्हीची खलनायिका माधवी निमकरचा पारंपारिक साज, लाल साडीत खुललं सौंदर्य

UPI New Rule: UPIचं दमदार फीचर! गुगल पे, फोन पे अ‍ॅपबाबत घेतला मोठा निर्णय

Breast cancer prevention:'या' एका साध्या आणि सोप्या उपायाने टाळता येतो ब्रेस्ट कॅन्सर; 10% ते 25% धोका कमी होत असल्याचं अभ्यासातून समोर

Pigmentation Skin Care: चेहऱ्यावरील पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी 7 घरगुती उपाय, वाचा नॅचरल टिप्स

SCROLL FOR NEXT