धुळे -
धुळ्यात थंडीचा कहर
आज धुळ्यामध्ये सहा अंशावर तापमानाचा पारा घसरला
वाढत्या थंडीचा परिणाम सकाळी घराबाहेर पडणार्या नागरिकांवर आणि शाळकरी विद्यार्थ्यांवर
पुणे -
पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्री लवकरच शेतकऱ्यांशी बैठक घेण्याची शक्यता
पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत राज्य शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार असल्याची माहिती
जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादनासाठी जमीनदर व मोबदला निश्चितीसंदर्भात बैठक
बैठकीत शेतकऱ्यांनी जमीनदर, मोबदला, आयकर सवलत, पुनर्वसन, नोकरी, वाढीव एफएसआय, सुविधा विकास आदी अनेक मागण्या मांडल्या
आंबादास दानवे यांच्याविरोधात रायगडमध्ये गुन्हा दाखल होणार
शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दिली माहिती
शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्याबाबतची चुकीची व्हिडीओ क्लिप प्रसार माध्यमांसमोर आणली
या व्हिडीओद्वारे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न दानवे यांनी केला असल्याचा आरोप
पुणे -
पुणे विमानतळावर २.२९ करोड रुपयांचा गांजा जप्त
प्रवाशाच्या बॅग मध्ये मिळून आला २ किलो गांजा
बँकॉक वरून परतणाऱ्या प्रवाशाकडे मिळून आलं अमली पदार्थ
पुण्याच्या एअर इंटेलिजन्स युनिट ची कारवाई
एअर इंटेलिजन्स युनिट कडून एका प्रवाशाला अटक
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.