Saam Tv Breaking News Live Updates In Marathi Maharashtra SAAM TV
महाराष्ट्र

Marathi News Live Updates : काँग्रेसला मोठा धक्का; आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवार गटात प्रवेश

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 14 October 2024 : आज सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणूक अपडेट, देश विदेशासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Hiraman khoskar News : काँग्रेसला मोठा धक्का; आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवार गटात प्रवेश

आमदार हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आमदार हिरामण खोसकर यांच्यासहित संपत सकाळे, जनार्दन माळी, संदीप गोपाळ गुळवे, उदय जाधव, दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर लहाने, विनायक माळेकर, पांडुमामा शिंदे, ज्ञानेश्वर कडू, जगन कदम यांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केला.

BJP Meeting : भाजप मुख्यालयात तिसरी बैठक सुरु

भाजप मुख्यालयात तिसरी बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित आहेत. भाजप अध्यक्ष जीपी नड्डा यांच्या सोबत जवळपास दहा मिनिटे स्वतंत्र बैठक

kalyan Rain : कल्याणमध्ये तुफान पाऊस, रेल्वे स्टेशन परिसरत पाणी साचलं

कल्याणच्या स्टेशन परिसरत पाणी साचले आहेत. एक तासाच्या जोरदार पावसामुळे स्टेशन परिसरात पाणी साचले.रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचल्याने कल्याणकरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Pune News : पुणे बोपदेव घाट सामूहिक प्रकरण, पोलिसांकडून दुसऱ्या आरोपीला अटक 

पुणे बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 25 वर्षीय आरोपीला पुणे पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली आहे. तीन आरोपींपैकी आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अद्यापही फरार असू पुणे पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

Badlapur Rain : बदलापुरात मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळलं

बदलापूर गावात मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळलं आहे.चिंतामणी चौक ते आमदार किसन कथोरे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड कोसळलं. एका कारचं मोठं नुकसान, सुदैवानं कुणालाही इजा नाही. तर बाजूचा विजेचा पोलही तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अग्निशमन दलाकडून झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Nagpur News : नागपुरात ४ विद्यार्थी कालव्यात बुडाले 

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील घोटीटोक परिसरात 4 शालेय विद्यार्थी मोठ्या कालव्यात बुडाले

Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

आज रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल होणार असल्याची माहिती आहे.

रात्री उशिरा अमित शहा यांच्या सोबत देखील भेट होण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला.

Maharashtra News : रामराजे यांच्या बंधूंचा शरद पवार गटात प्रवेश

रामराजे यांचे बंधू ,संजीवराजे निंबाळकर, रामराजे यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

Rain Update : अंबरनाथ,उल्हासनगर, बदलापूर भागात जोरदार पाऊस

अंबरनाथ,उल्हासनगर, बदलापूर भागात जोरदार पाऊस पडला आहे. अंबरनाथमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सुरु आहे. मागील अर्ध्या तासापासून ढगांच्या गडगडाटासह प्रचंड पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

Uddhav Thackeray Health Update : उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट

उद्धव ठाकरे यांचीअँजिओप्लास्टी झाल्यावर त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले आहे. त्यांची ३ वर्षांपूर्वी स्पाईन सर्जरी झाली होती. तसेच २०१२ साली त्यांची बायपास झाली होती. त्यामुळे त्यांना औषध आणि इतर बाबी कशा पद्धतीने द्याव्या? याबाबत डॉक्टर निरीक्षण करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना घरी कधी सोडायचे? याबाबत संध्याकाळी ६ नंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : प्रवीण लोणकरला पुण्यात अटक 

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला प्रवीण लोणकरला घेऊन मुंबई गुन्हे शाखेच पथक कोर्टाच्या दिशेने रवाना झाली आहे. प्रवीण लोणकर शुभम लोणकरचा भाऊ आहे. प्रवीण लोणकर कटातील एक सूत्रधार असल्याचा गुन्हे शाखेचा दावा आहे. शुभमसोबत धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना कटात सामील केल्याचा आरोप आहे.

Vinay Sahasrabuddhe : भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. सहस्त्रबुद्धे हे राज्याचे सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष आहेत. समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तीन वर्षांसाठी सहस्रबुद्धे हे समितीचे अध्यक्ष आहेत. महायुतीकडून ज्येष्ठ नेत्यांचे पुनर्वसन करणे सुरुच आहे.

Mahayuti press conference : महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होणार

महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. उद्या दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.

BJP Meeting : भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीसाठी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, मंत्री पियूष गोयल, पंकजा मुंडे, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, रावसाहेब दानवे बैठकीला पोहोचले आहेत. राज्यातील विधानसभेच्या जागांच्या नावावर आज चर्चा होणार आहे.महाराष्ट्र भाजप प्रभारी भूपेंद्र यादव आणि सह प्रभारी अश्विनी वैष्णव देखील बैठकीला पोहोचले.

Jayashree Thorat: बाळासाहेब थोरात यांच्यासाठी कन्या जयश्री थोरात मैदानात

काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासाठी त्यांच्या कन्या जयश्री थोरात या मैदानात उतरल्या आहेत.. संगमनेर विधानसभा मतदारसंघात जयश्री यांनी युवा संवाद यात्रा सुरू केली असून या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय.. गावोगावी जयश्री थोरात यांचे जल्लोषात स्वागत होत असून त्या युवक, महिला आणि जेष्ठांशी संवाद साधताय.. संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महायुतीकडून सुजय विखे यांच्या उमेदवारीची चर्चा असल्याने इथे विखे विरुद्ध थोरात असा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे.. याच पार्श्वभूमीवर जयश्री थोरात यांनी सुरू केलेल्या संवाद यात्रेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.. सुजय विखेंनी संगमनेर विधानसभेची उमेदवारी केली तर त्यांचे स्वागतच आहे मात्र त्यांना इथून निराश होऊन परत जावे लागेल अशी प्रतिक्रिया जयश्री थोरात यांनी साम टिव्हीशी बोलताना दिलीये..

Nanded News: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजी राजे यांचा आसूड मोर्चा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने आज नांदेडमध्ये आसूड मोर्चा काढण्यात आला.स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आसूड मोर्चा धडकला.या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टी झाली अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही,त्यासोबतच पीक विम्याची रक्कम देखील मिळाली नाहीय.सरकारने शेतकऱ्यांन संदर्भात कुठलेच निर्णय घेतले नाहीत. असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला.दरम्यान कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमावर मी परखड बोललो होतो.इकडे शेतकरी मारायला लागला आणि हे अतिवृष्टीत हे सांस्कृतिक कार्यक्रम घेत होते.शेतकऱ्यांन संदर्भात कृषी मंत्र्यांनी मदत जाहीर करावी.जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडे नुकसानीचे प्रस्ताव दिलेले आहेत.परंतु अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी धनंजय मुंडे यांच्या सह सरकार वर केला आहे.

Nagpur Rain: नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यातील मोवाड भागात परतीच्या पावसाने धुतले

- नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोवाड भागात परतीच्या पावसाने धुतले

- मुसळधार पावसाने संत्रा पिकाचे मोठे नुकसान

- परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या संत्रा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता

- पावसाने उसंत घेतली असली, तरी आज झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतात पाणी साचले.

पुणेकरांसाठी गुड न्यूज

पुण्यात आणखी नवे दोन मेट्रो मार्ग !

१) खडकवासला-स्वारगेट-हडपसर- खराडी

२) नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग

या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली असून यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.

आचारसंहिता लागल्यास उशीर झाल्यास एका टप्प्यात निवडणूक घेतली जातील अशी शक्यता आहे. हा निर्णय निवडणूक आयोगाचा आहे.
संजय शिरसाट

भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द

भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द

माझगाव कोर्टात हजर राहण्याच्या अटीवर मुंबई उच्च न्यायालयाकडून वाॅरंट रद्द

संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात नितेश राणेंना हजर राहावेच लागणार

17 ऑक्टोबरला नितेश राणे यांना माझगांव कोर्टात हजर राहावे लागणार

नितेश राणे यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती शाम चांडक यांनी दिला निर्णय

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात घेतली होती धाव

खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी दाखल केली होती याचिका

माझगाव कोर्टाने ऑगस्ट महिन्यात राणेंविरोधात बजावला होता अजामीनपात्र वॉरंट

वॉरंट रद्द करण्यासाठी राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात घेतली होती धाव

Uddhav Thackeray Health: उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल, अँजियोग्राफी होण्याची शक्यता

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव येथिल रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची शक्यता वर्तवली जात आहे

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर अॅजियोग्राफी होण्याची शक्यता आहे

Jalna News: लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ,  मराठा आंदोलकांची घोषणाबाजी..

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या सन्मान कार्यक्रमात गोंधळ,

बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील घटना.

भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी..

महिलांनी वाटण्यात आलेल्या साड्या आणि पर्स जाळल्या.

बदनापूर चे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या समोर घोषणाबाजी..

लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांचा सन्मान कार्यक्रमात मराठा अंदोलकांकडून घोषणाबाजी

Yavatmal News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळच्या बसस्थानकाचे ऑनलाइन लोकार्पण

कुठल्याही क्षणी निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ येथील नव्या बस स्थानकाचे लोकार्पण ऑनलाईन करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून या नवीन बस स्थानकाचे बांधकाम सुरू होते आज ते पूर्णत्वास झाल्यानंतर प्रवाशांच्या सेवेत हे बसस्थानक सुरू करण्यात असून. 17 बसेस एकावेळी लागणार आहेत. अंडरग्राउंड पार्किंग तसेच वाहक आणि चालकासाठी वर रेस्ट हाऊस ची व्यवस्था करण्यात आली आहे.

शाहादा तळोदा मतदार संघातून पुन्हा निवळून येणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या वतीने विविध कामांची उद्घाटनांना वेग आला असून राजकीय बैठकांचा जोर देखील वाढलेला आहे त्यातच शहादा तळोदा मतदार संघात पुन्हा भाजपचा कमळ फुलणार असल्याचा विश्वास भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केला असून राजेश पाडवी हे दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत त्यातच या मतदारसंघात गेल्या दोन टर्म पासून भाजपचाच आमदार निवडून येत आहे...

शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांची टोलमाफीवर प्रतिक्रिया

आज राज्य मंत्रिमंडळाने मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवर हलक्या वाहनांसाठी टोलमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. टोलपासून मुक्ती दिली. हीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१४ पासून वारंवार व्यक्त केली होती आणि त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्नही देखील केले होते. आज सरतेशेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात टोलमाफीचा निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो.

उद्धव ठाकरे एच एन रिलायन्स रुग्णालयात रुटीन चेक अपसाठी सकाळी पोहोचले आहेत

राज्यातील दोन मोठ्या नदी जोड प्रकल्पाना मंजुरी

दमण गंगा आणि गोदावरी नदी जोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

Pune : पुण्याच्या राजगड तालुक्यातील रांजणे गावच्या हद्दीत झालेल्या रिक्षा अपघातात मायलेकाचा दुर्देवी मृत्यू, तर एक जखमी

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात कोयता टोळीने गाड्या पेटवल्या.

पुण्याच्या मार्केट यार्ड भागातील गगन विहार सोसायटीत पार्किंग केलेल्या गाड्या कोयता टोळीच्या टोळक्याने पहाटे पेटवल्या. आगीत दोन दुचाकीस एक चार चाकी जळून खाक

महायुती सरकार आणण्यासाठी ताकदीने जागा लढवता येईल त्या संदर्भात निर्णय होईल. अमित शहा यांचा सूक्ष्म नियोजन असत. सगळे हरियाणा हरत असे सांगत असताना हरियाणा जिंकून येत आहे हे अमीतशः यांनी पहिले सांगितलं होतं.
सुधीर मुनगंटीवार

बाबा सिद्दिकी हत्येचा तपास करणारी मुंबई गुन्हे शाखा लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्याची शक्यता

इंदापूरच्या काँग्रेस भवन वरून आता नवा वाद

इंदापूरच्या काँग्रेस भावना वरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे इंदापूरच्या काँग्रेस भावनांचा ताबा सध्या हर्षवर्धन पाटलांकडे आहे जोपर्यंत काँग्रेस भावनांचा ताबा पुन्हा काँग्रेसकडे येत नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी शरद पवारांकडे केलीये.

काँग्रेस नेत्याचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

मी लाडकी बहिण योजनेच्या विरोधात बोललो असेल तर ते सिद्ध करावे...अन्यथा संविधान चौकात उठा बशा माराव्यात असे आव्हानच सुनील केदार भाषणातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे एका कार्यक्रमात बोलताना केदारांनी हे वक्तव्य केलय.

क्षुल्लक वादातून मुलाचा खून, चार जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे क्षुल्लक वादातून एका सतरा वर्षीय मुलाचा खून करण्यात आला. या मुलाचे चार आप्त या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यात दुचाकी ठेवण्यावरून दोन कुटुंबात वाद झाला. त्यामुळे एका कुटुंबाने चंद्रपूरवरून दोन गुंड बोलावले. या गुंडांनी रात्री येवून कामडी कुटुंबावर हल्ला केला.

विधानसभेसाठी भाजपची यादी जवळपास निश्चित

विधानसभेसाठी भाजपची यादी जवळपास निश्चित

150 ते 160 जागांवर भाजप लढण्याची शक्यता

वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती

महाराष्ट्र भाजपच्या यादीवर आज दिल्लीत नेतृत्वासोबत चर्चा होणार

महाराष्ट्र भाजपचे महत्त्वाचे नेते आज दिल्लीला रवाना होणार

मोठी बातमी! राज्यात उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून उद्या पत्रकारपरिषद घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कोजागिरीनिमित्त तुळजापूरसाठी 370 जादा एसटी गाड्या सोडणार

कोजागिरी पौर्णिमेला सोलापूरहून तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे यंदा सोलापूर एसटी डेपो मधून तुळजापूरसाठी 370 जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. येत्या 16 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे, त्या अनुषंगाने एसटी डेपो कडून भाविकांना प्रवासाची अडचण होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली जातीय. यामध्ये शहरातून 160 तर ग्रामीण भागातून 210 गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Marathi News Live Updates: अमरावती विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता

Marathi News Live Updates: अमरावती विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता बंडखोरीच्या तयारीत असल्याचे समोर आलेय. जगदीश गुप्तांनी बॅनरवरील कमळ चिन्ह व पक्षाच्या पदाचा उल्लेख काढला आहे. अमरावतीत भाजपला मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळाले आहेत. जगदीश गुप्ता अमरावती विधानसभा निवडणुकीत अपक्ष मैदानात उतरणार असल्याचं समोर आलेय. जगदिश गुप्ता हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून अमरावती मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

Chhatrapati Sambhajinagar: रेडीको एनव्ही कंपनीमधील बॉयलरचा स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, सीसीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू

IND vs AUS: लय अवघड हाय गड्या.. दोनदा बॅटिंगला येऊनही विराटला अवघ्या इतक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT