अपक्ष उमेदवाराचे पत्नी, बहीण मेव्हण्यासह अपहरण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचं अपहरण झाले आहे. शिर्डीहून संगमनेरमार्गे नाशिककडे जाताना त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आलीय. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. झिरो नंबरने गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात वर्ग होणार आहे. उमेदवार राजू शिंदे यांचे सहकारी मंगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. संगमनेर शहराजवळील समनापुर गावाजवळ घटना घडल्याची प्रथिमक माहिती आहे.
माजी खासदार गोपाल शेट्टी अपक्ष उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे ते उद्या उमेदवारी मागे घेतील असं सांगितलं जात आहे. गोपाल शेट्टी यांची उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस मध्यस्थी यशस्वी झाल्या सांगितलं जात आहे.
विक्रमगडची जागा भाजपने आपल्याकडे राखत जेष्ठ कार्यकर्ते हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी दिली. शिंदे गटाने या जागेसाठी मोठा आग्रह धरला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आणि निष्ठावंत प्रकाश निकम हे प्रबळ दावेदार होते. त्यांना लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने अखेर त्यांनी बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिरोळ विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांचा प्रचार सुरू झालाय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गणपतराव पाटील यांचा प्रचाराला सुरुवात होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे प्रचार सभा होत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र पाठविले आहे. या पत्रात राजीनामा स्वीकार करावा अशी विनंती करण्यात आलीय. मागील 17 वर्षांपासून पक्ष संघटनेसाठी काम करत असताना सुद्धा पक्ष पाठीशी उभा राहत नसल्याने ते नाराज झालेत. कामठी विधानसभा ही ठाकरे गटाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न होते.
स्वत: नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिलीय. काही दिवसांपूर्वी समीर खान यांचा अपघात झाला होता. पुढील काही दिवस मलिकांचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचसभेपासून प्रचाराचा नारळ फोडणार.लाडकी बहीण योजना, संविधान, आरक्षण यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर बरसण्याची शक्यता आहे. विविध विकासकामांची देखील घोषणा करतील अशी शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ड मिळालाय. आंबेडकर हे पुढील ४ ते ५ दिवसात निवडणुकीच्या प्रचारात होणार सामील आहेत. प्रकाश आंबेडकर सध्या एका वेलनेस सेंटरमध्ये भरती होणार आहेत. अँन्जोप्लास्टीनंतर उपचारासाठी या वेलनेस सेंटरमध्ये आंबेडकर यांना भरती करण्यात आले आहे.
राज्यात एकूण ७ हजार ६६ उमेदवार रिंगणात आहेत. पुढील २४ तासानंतर राज्यातील प्रमुख लढती निश्चित होणार आहेत. बंडोबांना थंड करण्याचे महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. आज पक्षाचे प्रमुख नेते बंडखोरांची समजूत काढण्यात यशस्वी होणार की नाही पाहणं महत्वाचं ठरेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत.
लातूर जिल्ह्यातल्या राखीव असलेल्या उदगीर विधानसभा मतदार संघातील भाजपचे बंडखोर उमेदवार विश्वजीत गायकवाड उमेदवारी अर्ज माघारी घेणार आहेत. आज जिल्ह्याचे प्रमुख नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. तर महायुतीचे नेते देवेंद्र फडणीस यांच्याशी फोनवरून संभाषण झाल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतल्याच जाहीर केलं आहे. तर महायुतीत उदगीर विधानसभा ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय बनसोडे यांना पाठिंबा देणार असल्यासदेखील यावेळी विश्वजीत गायकवाड यांनी सांगितले.
अलिबाग ते वडखळ आणि अलिबाग ते रेवदंडा या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. दिवाळी सुट्टीनिमित्त पर्यटक मोठ्या संख्येने अलिबागला आले आहेत. ते आता परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असून दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक अतिशय संथ गतीने पुढं सरकते आहे. यातून मार्ग काढताना वाहन चालकांची दमछाक होत आहे. वाहन चालकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी ग्रामीण भागात गेलेल्या प्रचार वाहनांना मराठा आंदोलकांनी विरोध करत ही वाहने माघारी परतुन लावली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील दाताडा देवठाणा या गावात आंदोलकांनी वाहन चालकांना गावात प्रवेश, करू नये अशी विनंती केली आहे.
धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या यशवंत सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आपला पाठींबा देत असल्याचे जाहीर केले आहे. या संघटनेचे अध्यक्ष आणि सरसेनापती माधव गडदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यानंतर ही भूमिका जाहीर केली आहे.
पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी पठारे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. पुढील काही दिवसात या मतदारसंघात शरद पवार यांची सभा होण्याची शक्यता आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असून अजित पवारांनी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनाच या ठिकाणाहून उमेदवारी दिली आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेची ओळख पटली
उल्हासनगरच्या फातिमा खान नावाच्या महिलेने धमकी दिल्याचे समोर
महिलेची चौकशी करून तिला पोलिसांनी बजावली नोटिस
महिलेच्या मानसिक स्वास्थ्याची केली जाणार वैद्यकीय तपासणी
मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता अज्ञात नंबरहून धमकीचा मेसेज
योगी यांनी १० दिवसात राजीनामा नाही दिला तर त्यांना बाबा सिद्धीकीसारखे मारू मेसेजमध्ये उल्लेख
विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ देखील राज्यात प्रचार करण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शहा कुटुंबाच्या भेटीला
हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने शहा कुटुंब नाराज
भरत शहा हे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष
शरद पवारांसोबत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि चिरंजीव राजवर्धन पाटील देखील उपस्थित
भरत शहा बंधू मुकुंद शहा आणि शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा सुरू
पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडीतील विधानसभा निवडणूक बंडखोरी टाळण्यासाठी आज शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अँड सचिन भोसले आणि संजोग वाघेरे यांनी पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक एका बँकवेट हॉल मध्ये घेतली होती. या बँकवेट हॉल मध्ये भोसरी विधानसभा क्षेत्राच्या पदाधिकारी बैठकीत सुरू असताना जोरदार घोषणाबाजी आणि राडा झाला आहे. भोसरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे बंडखोर पदाधिकारी रवी लांडगे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे. तर पिंपरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. आता सचिन अहिर यांच्या शिष्टाई नंतर रवी लांडगे आणि गौतम चाबुकस्वार आपला अर्ज मागे घेऊन बंडखोरी टाळणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
1. बीड - बीड विधानसभा
2. जालना - परतूर विधानसभा
3. संभाजीनगर - फुलंब्री विधानसभा
4. हिंगोली - हिंगोली विधानसभा
5. परभणी - पाथ्री विधानसभा
शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविले राजीनामा पत्र...
पत्रात राजीनामा स्वीकार करावा यासाठी केली...
मागील 17 वर्षांपासून पक्ष संघटनेसाठी काम करत असताना सुद्धा पक्ष पाठीशी उभार होत नसल्याची नाराजी असल्याचा बोलला जात आहे..
कामठी विधानसभा ही ठाकरे गटाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न होते..
संघटनेत काम करून जर मानसन्मान होत नसेल यावरूनच नाराजी असल्याचं बोललं जात आहे...
प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पदाचा राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गटाला मात्र तसेच महाविकास आढळल्याचा फटका बसण्याची शक्यता आहे
संजय राऊत शोले पिक्चरचे आसरानी आहे, त्यामुळे सर्व महाराष्ट्र त्यांची आता मजा घेत आहे. त्यांच्या बोलण्याची लोकांना मजा वाटते, लोक हास्यविनोद सारखा पाहत आहेत.चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
सांगोल्यात महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे. संजय राऊत यांनी आज सांगोल्याची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाची आहे. येथून दिपक साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा आम्ही ताकदीने लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सांगोल्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
आज भाऊबीजेच्या दिवशी संजय राऊत यांच्या तोंडात खडीसाखर पडो आणि त्यांना देवानं एक दिवस तरी चांगले बोलण्याची सुबुद्धी द्यावी असे साकडे शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी घातले आहे.
उल्हासनगरात मंदिराबाहेर स्त्री जातीचं अर्भक सापडल्याची घटना समोर आली आहे. या अर्भकाला स्थानिकांनी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं आहे.
१४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते रुपेश म्हात्रे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट....
रुपेश म्हात्रे यांनी भिवंडी पूर्वमधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा घेतलाय निर्धार....
रुपेश म्हात्रे यांना शिवसेनेत येण्याची आॅफर दिल्याची सूत्रांची माहीती
उद्धव ठाकरे मुलाला जिंकून आणण्यासाठी आमचा बळी देत आहेत'... 30 वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ, मात्र माझ्यावर अन्याय झाला'.... अन्याय सहन करणार नाही अशी भावना रुपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली व्यक्त
पडून अपमान पचवायची ताकत आपल्यात नाही. आपलयाला थोडे फारच मतदारसंघ निवडायचे आहेत. राजकारणचं वेड लागू द्यायचं नाही.
चंद्रपूर राखीव विधानसभा जागेवरील मनसे उमेदवाराने अर्जच भरला नसल्याचे गूढ कायम आहे. ऑगस्ट महिन्यात स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यादरम्यान चंद्रपुरात झालेल्या मेळाव्यात मनदीप रोडे यांची उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर रोडे यांनी प्रचारात आघाडी घेत क्षेत्र पिंजून काढले. मात्र अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत रोडे यांनी अर्ज भरण्याचे टाळले. या घडामोडीनंतर जिल्हाप्रमुख असलेले रोडे प्रयत्न करूनही माध्यमांसमोर येत नसल्याने वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरल्याने इतर इच्छुकांची संधी गेल्याने पक्षात चलबिचल वाढली आहे. पक्षातील अन्य पदाधिका-यांनी प्रकरण वरिष्ठ स्तरावर असल्याचे सूचक विधान केले आहे.
आमच्या पुढे मोठा राक्षस आहे, त्याची आम्हाला वाट लावायची आङे .मनोज जरांगे पाटील
नंदुरबार ते नवापूर रस्त्यावर खामगाव शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्यांच्या कळपास भरधाव वेगातील एसटी बसने धडक देत चिरडल्याने 13 मेंढ्या जागीच ठार तर काही मेंढ्या जखमी झाल्याची घटना घडली आहे अपघात घडताच एसटी बस चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यावेळी मेंढपाळांनी दुचाकी वर जात एसटी बसचा पाठलाग केला. मात्र ते मिळून आले नाही.या अपघातात 13 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या तर काही मेंढ्या जखमी झाल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, दोघांमध्ये अंतरवाली सराटीच चर्चा...
हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाचे कागल मतदार संघाचे उमेदवार आहे .
हसन मुश्रीफ यांनी मनोज जरांगे यांच्याकडे समर्थन माघितल असून मनोज जरांगे रात्रीपर्यंत सांगणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी भेटीनंतर दिली आहे...
दोन दिवसापूर्वी मुश्रीफ यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार समरजित घाडगे यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली होती
महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या मिळकतकर वसुलीस स्थगिती देण्यात आल्याने महापालिकेच्या मिळकतकराची उत्पन्नवाढ खुंटली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत १७२५ कोटींचा महसूल मिळाला आहे, तर ३१ मार्च अखेरपर्यंत आणखी ६०० कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा पालिकेस २६०० कोटींचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना पालिकेच्या उत्पन्नाचा गाडा २३०० ते २३५० कोटींवरच थांबण्याची चिन्हे आहेत.
फटक्यांमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण
फटाक्यांच्या आतषबाजीने शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता खालावली
शहरातील अनेक भागातील हवा धोकादायक पातळीवर
शुक्रवारी रात्रीच लक्ष्मीपूजनानंतर शहर आणि उपनगरांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ११५ वर
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक पुढीलप्रमाणे :
शिवाजीनगर – २५४
भूमकरनगर – १७४
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – २९८
कर्वे रस्ता – २०९
हडपसर – २८१
लोहगाव येथील म्हाडा कॉलनी – १५४
पंचवटी – १९६
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार
बारामती आता सोपी राहिली नाही
निकालानंतर कळेल किंगमेकर कोण
अजित पवार यांच्यासह सर्वांनी आधी जिंकून दाखवावे
कुणी जिंकून आलेल्या जागा सोडायला तयार नसतं.
दिवाळी निमित्त माथेरानला फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका इथं येणाऱ्या पर्यटकांना बसतो आहे. प्रवेश कर आकारण्यासाठी केवळ एकच खिडकी असल्याने पर्यटकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे खिडकीवर तोबा गर्दी उसळत आहे. त्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. दुसरीकडे पर्यटकांची वाहने उभी करण्याचे कुठलेही नियोजन दिसून येत नाही. अनेकांनी आपली वाहने घाट रस्त्यातच उभी करून ठेवल्याने पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. याला कंटाळलेल्या अनेक पर्यटकांनी मनस्ताप सहन करत अर्ध्या रस्त्यातून परतीचा मार्ग धरला.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी
मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरहून मेसेज
योगी यांनी १० दिवसात राजीनामा नाही दिला तर त्यांना बाबा सिद्धीकीसारखे मारू मेसेजमध्ये उल्लेख
विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ देखील राज्यात प्रचार करण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतून फोडणार प्रचाराचा नारळ
भाऊबिजेच्या दिवशी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मैदानात.
आज कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे शिवसेनेची पहिली जाहीर प्रचार सभा
संध्याकाळी शिवसेनेची पहिली प्रचार सभा कुर्ला-नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी होणार.
त्यानंतर रात्री अंधेरी पूर्व विधानसभेतील शेरे पंजाब मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची दूसरी सभा होणार.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मुर्जी पटेल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री घेणार सभा
वाशिमच्या कारंजा ते अमरावती मार्गावरील धणज गावाजवळ जवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. खुराणा आणि रॉयल ट्रॅव्हल्स मध्ये ही धडक झाली. दोन्ही ट्रॅव्हल्स मधील जखमींना अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलय.
मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी यंदाच्या हंगामातील पहिलीच देवगड हापूसची पेटी नाशिकला थेट ग्राहकापर्यंत पोहचवली आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर त्यांनी चार डझनाची पेटी थेट ग्राहकाला विक्री केली आहे. या पेटीला फोंडेकर यांना 25 हजाराचा विक्रमी भाव मिळाला आहे. फोंडेकर यांनी तिसऱ्यांदा पहीली आंबा पेटी विक्री करण्याचा मान मिळवला आहे. आंब्याचा हंगाम सुरू होण्यासाठी अजूनही तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे परंतु असे असले तरी या वर्षाच्या हंगामातील पहिली पेटी मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार फोंडेकर यांच्या बागेतून नाशिकला पाठविण्यात आली आहे.
येत्या 6 तारखेला मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ सोलापुरात धडाडणार
विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर मनसे उमेदवारांसाठी राज ठाकरे सोलापुरात घेणार सभा
येत्या 6 तारखेला सोलापूर जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या होणार दोन सभा
सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर मध्यच्या उमेदवारांसाठी सोलापुरातील भंडारी मैदानावर पार पडणार राज ठाकरे यांची सभा
तर सोलापूर ग्रामीण मधील उमेदवारांसाठी मंगळवेढ्यात पार पडणार राज ठाकरे यांची दुसरी सभा
सोलापूरच्या दोन सभेनंतर 6 तारखेला राज ठाकरे यांचा सोलापूर शहरात असणार आहे मुक्काम
त्यामुळे 6 तारखेच्या सोलापूरच्या सभेत राज ठाकरे नेमक काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दुखापत करणे,जबरी चोरी, खंडणीसह विविध १४ गुन्हे दाखल असलेल्या अर्जुन सलगर याच्यावर सोलापूर पोलिसांनी 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई केली आहे.अर्जुन सलगर याची पुण्यातील येरवाडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सोलापूरचे पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी हा आदेश काढला आहे.
कट रचणे,जागा बळकावणे, विनयभंग करणे,धाकदपटशा करणे,गैरकायद्याची मंडळी जमविणे,घातक शस्त्रांनी धमकवणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे.अर्जुन सलगर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत.अर्जुन सलगर याच्यावर २०११ मध्ये 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
इंदापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी आता खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत.इंदापूरात हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारी वरुन नाराज झालेल्या काही नेत्यांच्या शरद पवार आज ते गुप्त बैठका घेणार असल्याची खात्रिलायक सुत्रांची माहिती आहे.
पवार गटातील भरत शहा,आप्पासाहेब जगदाळे यांसह प्रविण माने यांची नाराजी अद्याप दूर झाली नाही. विशेष म्हणजे प्रविण माने यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केलीय. त्यामुळे पवार आज कोणाकोणला भेटणार आणि हर्षवर्धन पाटलांच्या विजयाचा मार्ग सुखर होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.