Mahayuti faces a setback as NCP announces solo contest in Akaluj Municipal Election. saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती आघाडीतून बाहेर पडून अकलूज नगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय.

Bharat Jadhav

  • अकलूज नगर परिषद निवडणुकीत महायुती तुटलीय.

  • राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • एनसीपीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए जबरदस्त विजय मिळवलाय. त्याचवेळी महाराष्ट्रात महायुतीमध्ये बिघाडी झालीय. एकीकडे विजयाची पताका बांधताना महायुतीला तडे गेले आहेत. अकलूज नगर परिषदेत महायुती तुटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे नाव देखील जाहीर करण्यात आले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी माहिती दिली.

दोन दिवसापूर्वी धवलसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर अकलूजमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी पद्मजादेवी मोहिते पाटील आणि जनसेवा संघटनेचे धवलसिंह मोहिते पाटील याच्या पत्नी उर्वशीराजे मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्याच नेतृ्त्वाखाली नगरपालिका निवडणुका लढवल्या जाणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अकलूजमध्ये या निवडणुका स्वबळावर लढण्यात येतील. यावेळी नगराध्यक्ष नगरसेवकासाठी उमेदवारी अर्ज वाटण्यात आली. नराध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट रास्ते यांना उमेवारी देण्यात आलीय. राष्ट्र्वादी पक्ष सर्व २६ जागांवर उमेदवार देणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिलेत. अकलूजमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. दरम्यान पद्मजादेवी मोहिते पाटील आणि उर्वशीराजे मोहिते-पाटील यांचा पक्ष प्रवेश सोहळा अजित पवार यांच्या उपस्थित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT