Nagarparishad Election x
महाराष्ट्र

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Nagarparishad-Nagarpanchayat Election 2025: राज्यातील २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. उद्या निकाल जाहीर होईल.

Priya More

Summary:

  • नगरपरिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

  • आज २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे

  • सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहिल

  • राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे.

राज्यातील २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. १४३ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राज्यातील अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, अनगर, मंगळवेढा, महाबळेश्वर, फलटण, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, वसमत, अंजनगाव सूर्जी, बाळापूर, यवतमाळ, वाशिम, देऊळगावराजा, देवळी, घुग्घूस या सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे.

नगरपरिषद आणि नगरपंयात निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही निवडणूक पार पडल्यानंतर उद्या २१ डिसेंबर रोजी राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अकोला -

अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपरिषदसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी साडेसात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली एकत्रित ४० हजार ५७२ मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २५ जागांसाठी ८५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तब्बल ४३ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. वंचित आणि स्थानिक नगर विकास पार्टीमध्ये आघाडी आहे. या लढतीत प्रामुख्याने पाहिलं तर एमआयएम, नगर विकास पार्टी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढतीच चित्र आहे.

वर्धा -

वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपालिकेत मतदानला सुरूवात झाली. देवळीत २० मतदान केंद्रावरून मतदान होत आहे. तर १६,४८५ मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्याच्या देवळी नगरपालिकेसह पुलगाव येथील २, वर्धा येथील २ आणि हिंगणघाट येथील २ जागासाठी मतदान होत आहे. देवळीत भाजपा, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजपाकडून माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस तर काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष असलेले सुरेश वैद्य आणि अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांच्यात टक्कर होणार आहे.

अहिल्यानगर -

अहिल्यानगर जिल्हयातील १२ पैकी ४ नगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा तसेच पाथर्डी नगरपालिकेसाठी मतदान होत आहे. मतदान प्रकियेला सुरूवात झाली आहे मात्र थंडीचा कडाका असल्याने मतदानासाठी अत्यल्प गर्दी पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचे तापमान ११ डिग्री सेल्सिअसवर आले आहे. नेवासा आणि कोपरगाव नगरपालिकेत आजी -माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. कोपरगावमध्ये महायुतीतले पक्ष एकमेकांसमोर तर महाविकास आघाडीचाही पॅनल असल्याचे पाहायला मिळत आहे.

हिंगोली -

हिंगोली जिल्ह्यातील वसमत नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. वसमत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण ५९,८५५ मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ३० हजार पुरुष तर २९,८५३ महिला मतदारांचा सहभाग आहे. दरम्यान १५ प्रभागासाठी ३० नगरसेवकपदाच्या जागेवर १२५ नगरसेवकपदाचे उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी ७ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान शहरातील संवेदनशील मतदान केंद्रावर निवडणूक विभाग आणि पोलिसांच्या वतीने चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुर्जी नगरपरिषदेसाठी आज मतदान होत आहे. नगराध्यक्ष आणि २८ सदस्यांसाठी मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी ७ तर सदस्य पदासाठी १७३ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे, शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शहरात एकूण ५२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख, मतदान कर्मचारी आणि महिला कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील मतदन केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

Kidney Racket : ५० हजार घेतले, ७४ लाख झाले; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या, विदर्भातील प्रकरणाने राज्यात खळबळ

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

SCROLL FOR NEXT