State Election commission  saam tv
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिका आणि २५ जिल्हा परिषद पंचायत समितीचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार २९ जुलै रोजी ही सोडत निघणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे ओबीसींच्या २७ टक्के राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिका आणि २५ जिल्हा परिषद पंचायत समितीचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार २९ जुलै रोजी ही सोडत निघणार आहे. त्यामुळे लवकरच राज्यात निवडणुकांचे (Election) पडघम वाजणार आहेत. ( Maharashtra Local Body Elections News)

जिल्हा परिषदा आणि समित्यांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी राखून ठेवायच्या जागांची संख्या एकूण जागांच्या २७ टक्क्यांपर्यंत असेल. तसेच एकूण आरक्षण जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने बांठिया अहवालानुसार, ओबीसी आरक्षणाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

दरम्यान, आयोगाच्या आरक्षण सोडतीच्या आदेशानुसार सर्वसाधारण महिलांचे आरक्षण, नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (महिला) या तीन विभागातील आरक्षण सोडत आता नव्याने करण्यात येणार आहे. अनुसुचित जाती आणि जमातीचे आरक्षण हे त्यांच्या लोकसंख्येनुसार झालेले असल्याने ते वगळून आता नव्याने सोडत निघणार आहे. त्यामुळे २९ जुलै रोजी आरक्षणाची सोडत निघणार आहे.

बांठीया आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू राहणार आहे. ठाणे शहरांत १०.०४ टक्के आरक्षण राहील. अमरावती,अकोला, सोलापूर पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव, वसई-विरार, भिवंडी येथे २७ टक्के आरक्षण ओबीसी समाजासाठी असेल. नागपूरमध्ये २२.०७, कोल्हापूर २३.०९, नवी मुंबई २०.०५ येथे ओबीसी समाजाचे आरक्षण घटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT