'भारत हीच प्राथमिकता', परदेशी शिक्षणासाठी सकाळ इंडियाच्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची भावना

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सकाळ इंडिया फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.
Sakal India foundation
Sakal India foundationSaam Tv
Published On

पुणे : परदेशात शिक्षण घेणाऱ्या आणि देशात राहून पीएचडी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सकाळ इंडिया फाउंडेशनने (Sakal India foundation) पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांसाठी सकाळ इंडिया फाउंडेशनकडून बिनव्याजी कर्जाऊ रक्कम उपलब्ध करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती (student scholarship) प्रदान कार्यक्रमाचे आयोजन सकाळ नगरमध्ये करण्यात आले होते. देशभरातील ५३ विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी सकाळ व फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतापराव पवार (Pratap Govindrao Pawar) यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं.‘‘जसा तुम्हाला आनंद झाला आहे. तसाच आम्हालाही झाला आहे. कारण योग्य विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी झाली आहे. कोणताही जात धर्म न पाहता केवळ गुणवत्तेच्या आधारावर ही निवड केली आहे, असं मार्गदर्शन पवार यांनी विद्यार्थ्यांना केलं आहे.

Sakal India foundation
उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण....; शिवसेना खासदार स्पष्टच बोलले

तसंच पवार पुढे म्हणाले, परदेशातील शिक्षणानंतर तुम्ही भारतात परत या. कारण देशातही खूप संधी असून त्यांचे अवकाश विस्तारण्याचे काम तुमचे आहे. तुमच्याकडे कुवत,क्षमता आणि संधी असून तीचा सर्वोत्तम वापर करा.पद्मनाभन यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची हीच योग्य वेळ आहे. या कार्यक्रमात सकाळ व फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतापराव पवार, उपाध्यक्ष एस.पद्मनाभन, विश्वस्त बी.जी.जाधव, खजिनदार रमेश बोडके,विश्वस्त महेंद्र पिसाळ,विश्वस्त मृणाल पवार उपस्थित होत्या. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न आम्ही पाहिले होते. ते सत्यात उतरविण्याची संधी सकाळ इंडिया फाउंडेशनने दिली आहे. या बद्दल आम्ही कृतज्ञ असून,आमच्यासाठी देश हीच प्राथमिकता असेल,असे मत शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

Sakal India foundation
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका; ९ मराठी कलाकारांना पुरस्कार जाहीर

कॅलिफोर्निया स्टेट पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी माझी निवड झाली आहे. या शिष्यवृ्त्तीद्वारे सकाळ इंडिया फाउंडेशनने मला मोठी संधी दिली आहे.ज्यामुळे मी माझे स्वप्न सत्यात उतरवू शकतो.

- अर्णव खटावकर, पुणे

खूप वर्षांपासून सकाळच्या या उपक्रमाबद्दल वाचले होते. आज प्रत्यक्ष माझ्या मुलीला याचा फायदा झाला असून, तिची या शिष्यवृत्तीसाठी निवड होणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझी मुलगी फाउंडेशनच्या अपेक्षांना खरी उतरेल असा मला विश्वास आहे.

- राजेंद्र माईणकर, पारूलचे वडील

लोणारीतील बाटू विद्यापीठातील माझे पीएच.डी.संशोधन आर्थिक चणचणीमुळे थांबले होते.फाउंडेशनच्या मदतीमुळे आता औषधनिर्माणशास्रातील माझे संशोधन पुढे नेता येणार आहे.

- आनंद प्रभाकर काकडे, मुळचे चिखली (बुलडाणा)

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात मी पदव्युत्तर शिक्षणासाठी चालले आहे. ही शिष्यवृत्ती माझ्यासाठी प्रेरणा असून, पर आल्यावर भारत देश हीच प्राथमिकता असेल.

- मनाली रासकर

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com