Maharashtra Mahayuti strategy for local body elections महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेय. नाव्हेंबरपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्याआधी महायुतीने जुळवाजुळव सुरू केली आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकामी महायुतीने एकत्र निवडणूक लढण्यावर जोर दिला आहे. तर काही ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये ठाकरेंच्याविरोधात महायुती ताकदीने लढणार आहे. बीएमसीवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप अन् शिंदेंनी कंबर कसली आहे. तर ठाण्यामध्ये महायुती स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकींबाबात भाजपकडून तसे संकेत मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता रंगतदार होणार, यात काही शंकाच नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मनपा निवडणुका ३१ जानेवारी २०२६ च्या आधी पार पडणार आहे. आयोग आणि राज्य सरकारकडून तशी तयारी करण्यात आली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबरनंतर घेण्यात येतील. ठाकरेंचं वचर्स्व असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती एकत्रित लढेल. तर ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याचे संकेत भाजपकडून मिळाले आहेत.
दिवाळीनंतर राज्यात निवडणुका होतील. नोव्हेंबरनंतर दोन ते तीन टप्प्यात राज्यातील निवडणुका होण्याची शक्यता आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती ताकदीने मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ठाणे अन् इतर काही भागात महायुती स्वतंत्र मैदानात उतरू शकते, असेही सांगण्यात येतेय. मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद जास्त आहे. त्यात राज ठाकरेंसोबत संभाव्य युतीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ठाकरेंची ताकद आणखी वाढणार आहे. अशात महायुतीनेही आपल्या बाजूने एकत्र, ताकदीने लढण्यावर भर देण्याचा प्लॅन आखल्याचे सांगण्यात येतेय. ज्या ठिकाणी युती शक्य नाही, त्या मनपामध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील, असं समजतेय.
मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीने एकत्र लढण्यावर जोर दिल्याचे सांगण्यात येतेय. पण काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही ठिकाणी भाजप शिवसेना अशी युती होऊ शकते, असे सांगण्यात येतेय. ठाण्यामध्ये शिंदेंनी स्वतंत्र लढण्यावर जोर दिलाय. तर पिंपरी चिंचवड, पुणे या मनपामध्ये अजित पवार स्वतंत्र लढण्याचा विचार करत असल्याचे समजतेय. छत्रपती संभाजीनगर, नागपूर यासारख्या महत्त्वाच्या मनपाबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.