Fadnavis meets Shinde and Ravindra Chavan over a strategic dinner to resolve Mahayuti tensions. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics:निवडणुकीपुरते वाद नंतर हम साथ-साथ; शिंदे-चव्हाणांसाठी फडणवीसांची 'डिनर डिप्लोमसी'

Ekanth Shinde Ravindra Chavan Rift Resolved: निवडणुक संपली आणि महायुतीतील वाद मिटल्याचे संकेत देण्यात आलेत. मात्र शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील वाद मिटवण्यासाठी नेमका कुणी पुढाकार घेतलाय ? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Jadhav

  • नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप–शिंदेसेनेत जोरदार आरोप-प्रत्यारोप

  • फडणवीस यांनी ‘डिनर डिप्लोमसी’ वापरत दोन्हांना एकत्र आणलं.

  • महायुतीने ‘हम साथ-साथ है’ असा संदेश देत पुन्हा एकजूट दर्शवली.

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेने एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप केले. त्यामुळे युती तुटण्याची चर्चा रंगली होती. मात्र अखेर या वादावर पडदा पडलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आरोप-प्रत्यारोप फक्त निवडणुकीपुरतेच होते. हे स्पष्ट केल्यानं भाजप आणि शिंदेसेनेनं हम साथ साथ है, हा नारा दिलाय.

खरंतर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर खरा संघर्ष पेटला तो महायुतीतच आणि त्याला कारण ठरलं भाजपनं शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी सुरु केलेलं ऑपरेशन लोटस. रवींद्र चव्हाणांनी कल्याण आणि डोंबिवलीतील शिंदेसेनेचे पदाधिकारी गळाला लावले आणि वादाची ठिणगी पडली. मात्र निवडणूक संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे आणि चव्हाणांसाठी डिनर डिप्लोमसी आयोजित करणार आहेत आणि त्यामुळे तिथंच या वादावर पडदा पडण्याचे संकेत रवींद्र चव्हाणांनी दिलेत.

सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, हिंगोली, बुलढाण्यात महायुतीत टोकाचे मदभेद झालेत. इथं मित्रपक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत.. त्यामुळे नेते निवडणुकीपुरते राजकीय आरोप करत असतील आणि त्यानंतर एकत्र येत असतील तर कार्यकर्त्यांनीही राजकीय नेत्यांकडून धडा घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुरक्षारक्षकांचा आवाज उठवल्यानं गुन्हा दाखल; पवई हिरानंदानी परिसरातील देशमुखांच्या 'त्या' राड्यावर पत्नीचा मोठा खुलासा

इंडिगोची धडाधड उड्डाणं रद्द; कधीपर्यंत पूर्ववत होईल इंडिगोची सेवा,सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

शिक्षकांचा एल्गार, 80 हजार शाळांना कुलूप, शिक्षकांनी का पुकारला बंद?

वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेसेना–भाजप राडा! कामगार युनियनवरून वाद चिघळला

अंधारात मोबाईलवर बोलणं आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

SCROLL FOR NEXT