Liquor Price Hike x
महाराष्ट्र

Maharashtra Liquor Price Hike : मद्यप्रेमींची चिंता वाढली, दारुचा पेग महागला; सरकारची मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री

Liquor Price Hike 2025 : मद्यप्रेमींनो आता तुमचं बजेट कोलमडणार आहे...कारण राज्य सरकारने मद्याचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय.. मात्र कोणती दारु किती महागणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

आता मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे.. कारण राज्य सरकारने महसूल वाढीसाठी थेट मद्याचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय... हा निर्णय नेमका काय आहे? पाहूयात....

राज्यात दारू महागणार

- भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत दीड टक्क्यांची वाढ

- हॉटेलमध्येही शॉपसारखी मद्याची विक्री करता येणार

- कराराद्वारे भाडेतत्त्वावर रेस्टॉरंटला विदेशी दारूविक्रीस परवानगी

- हॉटेल रेस्टॉरंटमधील दारू विक्रीवर 10 ते 15% अतिरिक्त शुल्क

- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने निर्णय

लाडकी बहीण योजनेसह इतर कल्याणकारी योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आलाय.. त्यातच राज्यावर 9 लाख 32 हजार कोटींचं कर्ज आहे.. तर वित्तीय तूट 1 लाख 10 हजार कोटींवर गेलीय.. त्यामुळेच ही तूट भरुन काढण्यासाठी दारुचे दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी म्हटलंय..

राज्य सरकारने दारुचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी कोणती दारु किती महाग होणार आहे? पाहूयात...

कोणती दारू किती महागली? (180 मिली दारू)

- देशी दारू- 80 रुपये

- महाराष्ट्र मेड लिकर - 148 रुपये

- भारतीय बनावटीचे विदेशी दारू - 205 रुपये

- विदेशी दारूचे प्रिमियम ब्रॅण्ड- 360 रुपये

सरकारच्या याच निर्णयामुळे मद्यप्रेमींना आर्थिक चटका सहन करावा लागणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT