Pune leopard crisis and government's response Saam Tv
महाराष्ट्र

बिबट्यांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी सरकारची मोठी घोषणा: ‘नसबंदी’ला हिरवा कंदील

Leopard Attacks Surge in Pune: पुणे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर या जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घातलाय. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेलाय. या आपत्तीवर आता राज्य सरकारने उपाय शोधलाय. काय आहे हा उपाय ? आणि बिबट्याची संख्या कशी वाढत गेली आहे?

Snehil Shivaji

राज्यात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यानं हैराण झालेल्या नागरिकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. पुणे जिल्ह्यात 5 वर्षात 60 टक्क्यांनी वाढलेल्या बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आता बिबट्यांची थेट नसबंदी करण्यात येणारेय. राज्य सरकारनं पाठवलेल्या बिबट्याच्या नसबंदीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे.

राज्यात बिबट्याची संख्या वेगानं वाढते. आणि त्यामुळे राज्यात नागरी वस्तीत बिबट्याचं हल्ले होण्याचं प्रमाण हे देखिल दुप्पटीनं वाढलंय. मजूर, लहान मुलं यांच्यावर झालेल्या हल्ल्यानं अनेकांचे जीव गेले होते त्यामुळे बिबट्याच्या वावरानं वनविभागा विरोधात नागरिकांचा संतापही अनावर झालाय. जुन्नरमध्ये तर बिबट्यानं दहशत माजवलीय. पुण्यातील बिबट्यांची संख्या 10 वर्षांत कशी वाढत गेली

बिबट्याची पैदास, नसबंदीचा उपचार

वर्ष 2015 – 450 बिबटे

वर्ष 2018 - 700 बिबटे

वर्ष 2021 - 980 बिबटे

वर्ष 2025 - 2 हजारांहून अधिक

2015 साली उत्तर पुणे जिल्ह्यातील 2015 साली 450 बिबटे असल्याची अधिकृत नोंद होती. 3 वर्षांनी 2018 मध्ये 250 बिबटे वाढले आणि एकूण 700 बिबटे या भागात असल्याची नोंद झाली. तर पुढील 3 वर्षांनी ही संख्या 280ने वाढून 980 इतकी झाली. आणि पुढील 4 वर्षांत याच भागात बिबट्यांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ होऊन ही संख्या 2 हजारांहून अधिक झाली.

उत्तर पुण्यातील शिरुर, जुन्नर आंबेगाव, आळेफाटा, पिंपरखेड आणि जांबुत या भागात बिबट्याच्या या वाढलेल्या संख्येनं सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल झालं. वन्यप्राण्याच्या शिकारी सोबतच पाळीव प्राणी आणि रहिवाशांवर या बिबट्यांचे हल्ले वाढल्याचं दिसलं. गेल्या १० वर्षांत बिबट्याची संख्या आणि हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत आणि शेतकऱ्यांपुढील संकट कसं वाढलं ते देखिल पाहूया.

बिबट्याचा कहर, शिरुर संकटात

मागील 10 वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत ४०० हून अधिक नागरिक जखमी

दरवर्षी 1500 पाळीव जनांवराचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी

10 वर्षांत 14 हजारांहून अधिक पशुधनाचे बळी गेल्यानं शेतक-यांचे नुकसान

बिबट्यामुळे या भागात मुलगी देण्यास अनेक वधुपित्यांनी नकार दिल्यानं या भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. बिबट्यांना पकडण्यासाठी हजारो पिंजरे लावूनही बिबट्यांना पकडण्यासाठी अपयश येतंय. वनविभागानं आतापर्यंत केवळ 348 बिबटे जेरबंद केले आणि केवळ 260 बिबट्यांना पुर्नवसनासााठी पाठवलं .त्यामुळे राज्यभरातील बिबट्यांची नसबंदीची अंमलबजावणी कशी करणार हा मोठा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BSNL चा धमाका! अनलिमिटेड कॉलिंग अन् १०० जीबी डेटा; विद्यार्थांसाठी आणला नवा प्लॅन

Shocking : क्षणात सर्व काही संपलं! सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू

Income Tax Refund: करदात्यांसाठी बातमी, कर परतावा कधी मिळणार, आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics: चंद्रपुरात भाजपसोबत मोठा गेम,४ नगरपरिषदांमध्ये पक्षात्तर करत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधातच बंडखोरी

Supreme Court :...तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT