Maharashtra Vidhan Bhavan Saam TV Marathi
महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या ९ नव्हे, तर १० जागांसाठी होणार निवडणूक; मतमोजणी आणि निकाल कधी? जाणून घ्या

MLC election Maharashtra : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी १० जागांवर १२ मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. राजकीय समीकरणांना वेग आला आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra MLC election 2026 schedule details : महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे होणाऱ्या नऊ जागांकरिता भारत निवडणूक आयोगाने द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या नऊ सदस्यांची मुदत 13 मे 2026 रोजी संपणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाने नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक तर एक जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. या एकूण 10 जागेसाठी मंगळवार 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान तर सायंकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणी करण्यात येणार आहे.

विधानपरिषद सदस्य संजय केणेकर, नीलम गोऱ्हे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे या नऊ सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत 13 मे 2026 रोजी संपणार आहे. त्याचप्रमाणे विधानपरिषद सदस्य डॉ.प्रज्ञा सातव यांच्या सदस्यत्वाची मुदत 27 जुलै 2030 रोजी संपणार आहे.

या निवडणुकीची अधिसूचना गुरूवार, 23 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल तर नामनिर्देशन पत्र गुरूवार, 30 एप्रिल 2026 रोजी सादर करण्यात येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी शनिवार 2 मे 2026 रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक सोमवार 4 मे 2026 असा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया बुधवार 13 मे 2026 रोजी पूर्ण करण्यात येईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जुळवाजुळव सुरू केली आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांना फक्त एकच जागा मिळू शकते. तर शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांना एकच जागा मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपकडून ६ जागांसाठी लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT