Maharashtra Legislative council Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Legislative council : महाविकास आघाडी विधान परिषदेतही महायुतीला झटका देण्याच्या तयारीत; तिसऱ्या उमेदवाराचीही केली घोषणा?

Maharashtra Legislative council Election Update : महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांनी विधान परिषदेची उमेदारी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

Sandeep Gawade

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता विधान परिषदेच्या 11 जागा बिनविरोध होणार अशी चर्चा रंगली होती. लोकसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर या मतदारसंघात मिळालेल्या यशामुळेच महायुतीला पुन्हा एकदा झटका देण्यासाठी महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आमदार पळवा पळवी चे राजकारण पाहायला मिळणार? की कोणता उमेदवार उमेदवारी अर्ज माघार घेणार यांचं चित्र येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

भाजपचे विधान परिषदेचे 5 उमेदवार

1)पंकजा मुंडे

2) परिणय फुके

3) सदाभाऊ खोत

4) अमित गोरखे

5) योगेश टिळेकर

राष्ट्रवादी काँग्रेस (AP)

1) शिवाजीराव गर्जे

2) राजेश विटेकर

शिवसेना

1) कृपाल तुमाने

2) भावना गवळी

शिवसेना - उबाठा

1) मिलिंद नार्वेकर

शेकाप - शरद पवार समर्थित उमेदवार

1) जयंत पाटील

काँग्रेस

1) प्रज्ञा सातवर

अपक्ष

अरुण जगताप

अजय सिंह सेंगार

विधान परिषदेसाठी आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस असल्याने ११ जागांसाठी तब्बल १४ अर्ज भरले गेले. यात महायुतीतर्फे ९ जागांवर उमेदवारी अर्ज भरण्यात आले तर महाविकास आघाडी तर्फे ३ अर्ज भरण्यात आले. या व्यतिरिक्त आणखी २ अपक्ष अर्ज देखील भरण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपले विश्स्वासू आणि प्रत्येक राजकीय पक्षाशी जवळीक असलेले ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवून वेगळी खेळी केल्याची चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीकडे ३ उमेदवार निवडून येतील इतकं पक्षीत बलाबल आहे . काँग्रेसकडे ४५, ठाकरे गटाकडे १६ आणि शरद पवार गटाकडे १३ मते आहेत. एकूण ७३ मते मविआकडे आहेत. मतांचा कोटा २३ चा आहे. त्यामुळे ७४ संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना २४ मते मिळू शकतात. आकड्याचे गणित पहाता महाविकास आघाडीच्या तिन्ही सदस्यांचा विजय हा निश्चित आहे. मात्र क्रॉस वोटिंगची शक्यता पहाता या तीन पैकी एका उमेदवाराच्या यशाबाबत साशांकता देखील व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Nagpur Shocking : पोहायला पाण्यात उतरले, बाहेर आलेच नाहीत; नागपूरमध्ये एकाच दिवशी ३ मुलांचा मृत्यू

Sangli : महापालिका विरोधात शिवसैनिकांच्या नदीत उड्या; कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Baby Care: लहान बाळांच्या त्वचेवर चुकूनही या ३ गोष्टी लावू नका; नाहीतर होईल हे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT