Maharashtra legislative council election Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Elections: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार, विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक

Maharashtra legislative council election 17 seats details : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या १७ जागांसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार राजकीय लढत पाहायला मिळणार आहे.

Ganesh Kavade

Maharashtra MLC election news : महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. होय, विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील जागांसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असल्या तरी, नियमानुसार या प्रक्रियेत कुठलाही अडसर येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुले पुढील १० ते १२ दिवसांत या निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या १७ जागा रिक्त होत्या. तसेच, विधानसभेतून निवडून द्यायच्या 9 जागांसाठीही येत्या काही दिवसांत निवडणूक जाहीर होऊ शकते. यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. महायुती आणि महाविकास आघाडीत जागांसाठी रस्सीखेच पाहायला मिळणारेय. राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या १७ जागांवर कोण बाजी मारणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याने विधान परिषदेच्या १७ जागा भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. १७ मतदारसंघातील निवडणुकी संदर्भातला अहवाल लवकर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. २० जिल्हा परिषदाची निवडणूक बाकी असली तरी परिषदेच्या १७ जागांची निवडणूक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

या मतदारसंघात होऊ शकते निवडणूक

सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ल, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजी नगर-जालना, नागपूर

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक -

उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या ९ आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. या ९ जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपुष्टात येणार आहे. भाजपच्या वाट्याला ५, शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडी १, विधानसभेतील संख्याबळानुसार चित्र आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त १३ मतं, अशात महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : दुहेरी हत्याकांडातील साक्षीदार; महाराष्ट्रातून अपहरण, शेजारच्या राज्यात नेऊन हत्या, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवासी बसला इंधन टँकरची धडक; अपघातानंतर भडका उडाला, १६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्पती रामनाथ कोविंद यांनी घेतलं काळाराम मंदिरात दर्शन..

Swollen feet causes: सतत पाय सुजतायत का? तुमच्या शरीरात लपलेत हे ६ गंभीर आजार

कल्याणची देसाई खाडी प्रदूषणाच्या विळख्यात; सांडपाण्यामुळे जलपर्णीचा सुळसुळाट

SCROLL FOR NEXT