दोन दिवसापासून आमदार प्रसाद लाड हे छत्रपती संभाजी नगर मध्ये तळ ठोकून होते मात्र ते आज मनोज जडांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत.
सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत प्रसाद लाड ही छत्रपती संभाजी नगर मध्ये दोन दिवसापासून आहेत.
काल प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जरंगे पाटलांची भेट घेतली होती मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात त्यांचे समाधान झाले नाही त्यामुळे आज स्वतः प्रसाद लाड आमदार म्हणून या ठिकाणी आलेले आहेत
रायगडच्या पेण तालुक्यातील मळेघर ग्रुप ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यमान महिला ग्रामपंचायत सदस्या वैशाली साळवी आणि त्यांचे पती सुनील साळवी यांच्यावर भर ग्रामसभेत जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे. आरोपींनी लाकडी दांडक्याच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात ग्राम पंचायत सदस्या वैशाली साळवी आणि त्यांच्या पतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोघांवर पेण मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात दिलीप पाटील, जनार्दन पाटील, धनिका पाटील, निलिमा पाटील, जयवंती पाटील, दयान पेणकर, कमलाकर म्हात्रे या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुसण्यासाठी काही लोक टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात आमदार संग्राम जगताप
मालेगाव येथील उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात आल्याने नव्या विवादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्यानंतर हिंदू संघटनांनी आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर हा फोटो काढण्यात आला होता.
मात्र, आता नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर तोच फोटो पुन्हा लावण्यात आला आहे. फोटो काढण्यामागे कोणताही राजकीय किंवा वादाचा मुद्दा नसून कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने तो तात्पुरता काढण्यात आला होता, असा खुलासा उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला.
गडचिरोलीत ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न फसला - 24 तासात 3 आरोपी जेरबंद
गडचिरोलीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जबरी चोरीचा प्रयत्न - पोलिसांनी 24 तासात आवळल्या मुसक्या
जंगल सोसायटीसमोर मिरची पावडर फेकून लुटण्याचा प्रयत्न - फिर्यादी सुरेश भोजपूर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
गोविंद बाग येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘शरद मॅंगो’ या विशिष्ट जातीच्या आंब्यांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी त्यांनी गोविंद बागेतील AI तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतलेल्या ऊस पिकाचीही पाहणी केली.
- सेवाग्राम येथील बापूराव देेशमूख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
- वेतनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
- अध्यक्ष समीर देशमुख यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन
- वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट
- सध्या एक महिन्याचे वेतन देऊन पुढील वेतन सुरळीत करण्याच्या व्यवस्थेबाबत माहिती देण्याची मागणी
- गेल्या वीस दिवसापासून आंदोलन सुरूच
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याने वासराची शिकार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रणित मावळे यांच्या शेतात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. वासराचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून परिसराची पाहणी सुरू आहे.
वाशीमच्या दुबळवेल येथील जगदंबा देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिरातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मध्यान्ह भोजनाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरची अंमलबजावणी तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी नांदेड जिल्हा परिषदेसमोर शिक्षक सेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
राजस्थानहून पत्रे घेऊन नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनरचा आज दुपारी फेकरी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. कंटेनरमध्ये चालक अडकून गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कंटेनरचा पत्रा वर करून चालकाची सुटका करण्यात आली. त्यानंतर जखमी चालकाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांना होणाऱ्या विरोधावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधलाय.
धुळे सोलापूर महामार्गावर महाकाळा येथील उड्डाण पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. सरकार जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मराठा समाज बांधवांनी केलाय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून कोणताही तोडगा निघत नसल्याने मराठा समाज बांधव आक्रमक झालेत.
चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पाचव्या दिवशी भंडारा जिल्ह्यात पावसानं सर्वदूर जोरदार हजेरी लावली. भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, पवनी, साकोली आणि लाखांदूर तालुक्यात पावसाच्या हजेरीनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या हजेरीनं भातपीक आणि भाजीपाला वर्गीय पिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागानं उद्या भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला असून नागरिक सतर्क रहावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
अकोला जिल्हा परिषदेत आज पंचायतराज समितीचे आगमन झालंय. आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय 28 आमदारांची ही समिती दोन दिवस अकोला जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेणारेय. आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात समितीची बैठक सुरू असून, विविध विभागांच्या कामकाजाची झाडाझडती घेतली जातीये. विशेष म्हणजे, समितीसमोर आज अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि कैफियती मांडल्यात. समितीचे अध्यक्ष संतोष दानवे यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. उद्या जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.
धुळे महापालिकेने अतिक्रमणांवरील कारवाई तीव्र केली आहे. धुळे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रशासकीय तोडगा काढत धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने चाळीसगाव रोड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.
निवडणूक आयोगाने एका रात्रीत निर्णय घेतला नाहीये. राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरेंसोबत नव्हता. निवडणूक आयोगाने सांगूनही पक्षातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. पक्षातील निवडणूक घेण्याची पद्धत का बदलली.
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्हाबाबत सुनावणी चालू आहे. कोर्टात शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जात आहे. वकील निरज किशन हे शिंदे गटाकडून युक्तीवाद करत आहेत. पक्षात नाराजी होती. पक्षाची घटना लोकशाहीवादी असावी असा युक्तीवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केलाय.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत संगठन सृजन अभियानाचा समारोप झाला. यावेळी आदिवासी विद्यार्थी आंदोलकांसोबतही राहुल गांधींनी संवाद साधला. तसेच नवनियुक्त ७२ जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना राहुल गांधींनी मार्गदर्शन केलं.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव बंदची हाक देण्यात आली आहे. हदगाव तालुका कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिर या ठिकाणी उद्या सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन
पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित राहणार
पुणे शहरातील सर्व गणेश मंडळे बैठकीत होणार सहभागी
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच डीजे प्रश्नाबाबत बैठकीत होणार चर्चा
परभणी महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. थकीत वेतन आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वाढीव जीएसटी अनुदान देण्याच्या मागणीसाठी गेल्या १० ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. आज आंदोलक कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको केला.
माजलगावमध्ये धक्कादायक घटना
सिद्धेश्वर कॉलेजसमोर दहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण
जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून विद्यार्थ्यांच्या गटाने केला हल्ला
मारहाणीत विद्यार्थी जखमी
लातूर -
मराठा तरुण आक्रमक, लातूरच्या सामाजिक न्याय भवनावर मराठा तरुण चढले
आक्रमक तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी
मागण्या मान्य नाही झाल्यास उड्या घेऊ असा तरुणांचा इशारा
सोलापूर -
- राज्यात दुष्काळ जाहीर करून विमा भरपाई द्या
- शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी
- एल निनोच्या प्रभावामुळे सोलापूर जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झालाय.
- संतप्त शेतकऱ्याने सोयाबीन पिकावर रोटर फिरवत पेरलेले पीक काढून टाकले
- बार्शी तालुक्यातील वानेवाडी गावातील शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे
- दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून चालू खरिपातील पिके पावसाअभावी करपू लागलीत
- तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकावरून शेतकऱ्यांना रोटर फिरवावा लागत आहे
- सरकारने तात्काळ विमा कंपन्यांना पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची शेतकरी संघटनेची मागणी
डोंबिवलीत पाण्यासाठी चमचा मोर्चा
संतप्त नागरिकांचा पालिका कार्यालयावर धडक मोर्चा
प्रभाग १९ आणि २७ मध्ये तीव्र पाणीटंचाई; चमचाभर तरी पाणी द्या म्हणत नागरिकांचा प्रशासनाला सवाल
नाशिक -
- राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस शिबिर
- पक्षाची आगामी वाटचाल आणि तरुणाईला पक्षाशी जोडण्यासाठी राहुल गांधी करणार जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
- या शिबिराच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी
उरळी कांचन येथे लक्ष्मण हाके यांच्या मोर्चामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी
मुंबईच्या दिशेने लक्ष्मण हाके निघाले आहेत
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्र्यांचे शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांत बैठक सुरू
मनोज जरांगे याना पाठवलेला draft बाबत अजूनही उत्तर आले नाही
पुढील दिशा ठरवण्यासाठी अधिकारी आणि मंत्र्यांत बैठक
जालना जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक उपस्थित
विखे पाटील, उदय सामंत आणि प्रसाद लाड उपस्थित
अकलूज येथील RTO कार्यालयातील स्वच्छतागृहातच चहा-कॉफी तयार करण्यासाठी कँटीन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन टॉयलेटच्या बाजूच्या अरुंद जागेत टेबल लावून त्यावर चहाचे कप, ट्रे आणि कपबशा ठेवण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे स्वच्छतेच्या प्रश्नावर नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून, संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सांगली महापालिकेच्या घरपट्टी कराविरोधात आंदोलन सुरू असतानाही 1 एप्रिल ते 30 ऑगस्टदरम्यान तब्बल 20 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. यामध्ये महापौर अभय योजनेतून 8 कोटी रुपये जमा झाले असून, संबंधित मिळकतधारकांची 3 कोटी रुपयांची शास्ती माफ करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. आदिवासी मंत्र्यांनी आपली फसवणूक केल्याची खंत उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. राहुल गांधी आज नाशिक दौऱ्यावर असल्याने विद्यार्थी त्यांच्या भेटीत आपल्या मागण्या मांडणार असून, यासंदर्भात आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी विद्यार्थ्यांशी बातचीत केली.
मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याशी फोनवरून संवाद साधत धुळे-सोलापूर महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाची माहिती दिली.
काळकुटे यांनी शिष्टमंडळाने तात्काळ अंतरवाली येथे येऊन मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्याची विनंती केली.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे वर्ग करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, CBI अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच दिशा यांच्या वडिलांचा जबाब नोंदवून त्याआधारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
नंदुरबार शहरासह परिसरात महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
जालन्यातील वडीगोद्री फाट्यावर मराठा बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, गाडी सोडण्याच्या कारणावरून पोलिस आणि मराठा बांधवांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आले.
जालना - छत्रपती संभाजी नगर महामार्ग मराठा बांधवांनी रोखला
सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे मराठा बांधव आक्रमक.
वडीगोद्री येथील पुलावरती मराठा बांधवांचा रस्ता रोको
घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा
आंदोलकांची सरकारविरोधात घोषणा बाजी
पालघरच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या मासवण येथील आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई. संस्थेचे अध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे उपनेते निलेश सांबरे यांच्यासह संस्थेतील सदस्यांवर गुन्हा दाखल .
लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची छाया अधिक गडद होत चालली आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. अनेक भागांत पिके सुकण्याच्या मार्गावर असून, आगामी काळात पाणीटंचाईचे संकटही गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला, त्यामुळे शासनाने लातूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची उपायोजना करावी अशी विनंती काँग्रेस नेते तथा माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे.
- राहुल गांधी आज नाशिक दौऱ्यावर असतानाच दुसरीकडे भाजप होणार आक्रमक
- नारी वंदन विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याबद्दल नाशिक भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येणार
- जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणाऱ्या आंदोलनात भाजपच्या प्रमुख पदाधिकारी होणार सहभागी
- काँग्रेसने नारी विधेयकाला विरोध केल्याने भाजपकडून काळे कपडे परिधान करून तसेच काळेफिती लावून करण्यात येणार निषेध आंदोलन
- काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर असताना भाजपकडून नारी वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ आंदोलन
जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. जरांगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात रात्री उशिरा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन मागण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट तुमच्या हातातला हा विषय नसून जे शिष्टमंडळ तुम्हाला या ठिकाणी पाठवत आहे. त्यांना सांगा की तुम्ही इथे या चबरोबर मनोज जरांगे यांची बीपी शुगर नो झाली असून त्यांना उपचाराची गरज आहे मात्र त्यांनी स्पष्ट उपचारासाठी नकार दिलेला आहे आणि मनोज रंगे पाटील यांचे प्रकृती खालावल्यानंतर मराठा बांधवांनी ही अंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान जरागेंच्या मागण्यांबाबत सरकारच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली...जरागेंना मसुदा देण्यात आला असून त्यांनी आपली प्रतिक्रिया कळवावी...मसुद्यात काही त्रुटी असल्यास आम्ही त्यात बदल करू असं राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी म्हटलं...
पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. नांदेड शहरातील विष्णुनगर मधील रोड नंबर 26 वर ही घटना घडली. मानसी संजय जाधव असे मयत झालेल्या युवतीचे नाव आहे.मानसी आपल्या स्कुटीवरून जात असताना रेल्वे विभागाच्या पिकअप जिपने धडक दिली. जीपच्या चाकाखाली आल्याने मानसीचा जागीच मृत्यू झाला.
नवी मुंबईतील बचत गट आणि घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई मनपाचे सभागृह नेते सागर नाईक यांनी लखपती दीदी योजना राबविण्याची घोषणा केलेय. केवळ घरगुती उत्पादनावर न थांबता उत्पादनाला विक्रीसाठी देशभरात योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न मनपा करणार आहे. येणाऱ्या महासभेकडे लक्ष असुद्या लखपती दीदी योजना आणणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महापालिका असेल असा विश्वास व्यक्त करत या योजनेच्या माध्यमातून अनेक महिला लखपती होतील अशी प्रतिक्रिया सागर नाईक यांनी व्यक्त केलेय.
अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केलाय.. सहायक आयुक्त देवानंद वीर यांच्या मार्गदर्शनाखाली या पेढीची प्रत्यक्ष तपासणी केली होती. या तपासणीत पेढीच्या गोदामात व कामाच्या ठिकाणी अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. मात्र, फेरतपासणीतही पेढीने या गंभीर त्रुटींची पूर्तता केली नसल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर प्रशासनाने त्यांचा अन्न परवाना निलंबित करण्याचा कठोर निर्णय घेतला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजीपणाविरुद्ध यापुढेही कठोर मोहीम सुरूच राहील, असा इशारा यावेळी दिलाय
अमरावतीच्या मेळघाटातील डोमा आदिवासी निवासी मुलींच्या आश्रमशाळेत भुताची अफवा पसरल्याने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह प्रशासनाने शाळेत अर्धी रात्र मुक्काम केला. यावेळी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांन सोबत जेवणही केले.जुन्या वस्तीगृहातून शाळेच्या नवीन सुसज्ज इमारतीत मुलींचे वसतिगृह स्थलांतरित करण्यात आले असून, येथे सुमारे ३०० मुलींच्या निवासाची व्यवस्था आहे. मात्र भुताच्या अफवेमुळे मुली अद्याप रात्री वसतिगृहात राहण्यास घाबरत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी न भिती शाळेमध्ये यावं असं आवाहन करण्यात आलं आहे, तर विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी सप्तखंजेरीवादक संदीप पाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह आमदार केवलराम काळे,प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित होते. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
यंदाच्या पावसाळ्यात वरूनराज्याची यवतमाळ जिल्ह्यावर अवकृपा कायम असून ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र असून ऑगस्ट महिन्यात 253 मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 55 मि.मी. पावसाची नोंद झालीये,त्यामुळे महिन्याभरातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत अवघा 21 टक्के पाऊस झाला त्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडलाय.
अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवरून अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.. निकृष्ट जेवण आणि मेसमधील अस्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एफडीएने गेल्या 6 महिन्यांत तब्बल तिसऱ्यांदा धाड टाकली..
तपासणीदरम्यान मेसमध्ये निकृष्ट धान्य, अस्वच्छता, शिवाय कॅन्टीन एका व्यक्तीच्या नावावर असताना प्रत्यक्षात दुसऱ्याच व्यक्तीकडून चालवली जात असल्याचे आढळून आले. यापूर्वीही कारवाई करून मेस सील करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा मेस सुरू असल्याचे समोर आले.
माढा तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 100 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
जानेवारी मध्ये या कामांचे भूमिपूजन केले जाईल असे यावेळी गोरे यांनी स्पष्ट केले.
माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या अमृत महोत्सव सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी आमदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.